MLA VS Babu Death : मुख्यमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या आमदाराचे निधन; देशभरात 'जायंट किलर' म्हणून आले होते चर्चेत

VS Babu, TVK MLA VS Babu, MK Stalin : बाबू आणि स्टॅलिन यांच्यातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर स्टॅलिन यांचा साडे आठ हजारांहून अधिक मतांनी पराभव करत बाबू हे जायंट किलर बनले होते.
TVK MLA VS Babu
TVK MLA VS BabuSarkarnama
Published on: 
Updated on: 

Tamil Nadu Politics : तामिळनाडूच्या सत्ताधारी तमिळगा वेट्टी कजगम पक्षाचे ज्येष्ठ आमदार व्ही. एस. बाबू यांचे गुरूवारी दीर्घ आजारपणामुळे निधन झाले. कोलाथूर विधानसभा मतदारसंघाच्या काही महिन्यांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व तेलगु देसम पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचा पराभव केला होता. त्यामुळे देशभरात जायंट किलर म्हणून ते चर्चेत आले होते.

व्ही. एस. बाबू हे ७५ वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून ते श्वसनाशी संबंधित आजारामुळे त्रस्त होते. त्यांना ९ सप्टेंबर रोजी उपचारासाठी चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टरांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र, अखेर बाबू यांनी गुरूवारी दुपारी दुपारी २ वाजून २४ मिनिटांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

बाबू यांच्या निधनामुळे संपूर्ण तमिळनाडूत दु:ख व्यक्त केले जात आहे. ते अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रीय होते. मे २०२६ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील महत्वाची निवडणूक ठरली. त्यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्षाकडून निवडणूक लढवत थेट तत्कालीन मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासमोर आव्हान उभे केले होते.

TVK MLA VS Babu
IAS Officer Harassment : धक्कादायक : आमदाराकडून महिला जिल्हाधिकाऱ्यांना अश्लील मेसेज, नशेत गेले निवासस्थानी? हायकोर्टात याचिका, राज्यपालांसह महिला आयोगाकडूनही दखल

बाबू आणि स्टॅलिन यांच्यातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर स्टॅलिन यांचा साडे आठ हजारांहून अधिक मतांनी पराभव करत बाबू हे जायंट किलर बनले होते. त्यांच्या विजयाची संपूर्ण देशात चर्चा झाली. बाबू हे टीव्हीकेचे संयुक्त महासचिवही होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात डीएमकेमधून झाल्याचे सांगितले जाते.

TVK MLA VS Babu
Gokul Dairy News : 'गोकुळ'मध्ये मोठा धमाका; प्रशासकांनीच फोडलं तत्कालीन संचालक मंडळाचं बिंग, निर्णयांवर थेट प्रहार

पुरासावलकम मतदारसंघातून बाबू यांनी २००६ मध्ये निवडणूक जिंकत विधानसभा गाठली होती. त्यानंतर ते अण्णाद्रमुकमध्ये दाखल झाले होते. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच त्यांनी टीव्हीके पक्षात प्रवेश करत संघटनेची जबाबदारी स्वीकारली होती. राजकारणातील तगडा अनुभव असल्याने त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली होती. तसेच थेट स्टॅलिन यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.