Shehzad Poonawalla : भाजपला धक्का : बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, भाजप सोडताच मागितला थेट पंतप्रधान मोदींचाच राजीनामा; व्हिडिओ व्हायरल

Shehzad Poonawalla BJP Resignation : काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या शहजाद पूनावाला यांनी भाजपला देखील धक्का दिला आहे.
pm narendra modi amit shah
pm narendra modi amit shahsarkarnama
Published on
Updated on

BJP Resignation News : २०१७ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवरून मतभेद झाल्यानंतर शहजाद पूनावाला यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अभ्यासू वृत्ती आणि आक्रमक वक्तृत्वशैलीमुळे भाजपने त्यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली होती. पण याच शहजाद पूनावाला यांनी भाजपला मोठा धक्का देत पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच राजीनामा देत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राजीनामा मागितला आहे. सध्या याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर पूनावाला यांच्या या राजीनाम्याने भाजपला धक्का बसल्याचे मानले जात असून, पूनावाला पीएम मोदींचे खंदे समर्थक मानले जातात.

काल शुक्रवारी (ता. ३१) राष्ट्रीय राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. एकीकडे नीट पेपरफुटीमुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागल्याने राजकीय वर्तुळात भाजपविरोधात वातावरण तयार झाले आहे. अशातच आता विविध माध्यमांवर आक्रमकपणे भाजपची बाजू मांडणारे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अशातच शहजाद पूनावाला यांनी एक्स (X) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राजीनामा मागितला आहे. त्यांनी पंतप्रधानांना गेल्या १२ वर्षांत नीट हुकूमशहा कसे बनायचे हे सुद्धा शिकता आले नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. तर हुकूमशाही काय असते, हे त्यांनी राहुल गांधींकडून शिकावे, असेही म्हणत राहुल गांधींवर टीका केली आहे.

pm narendra modi amit shah
Narendra Modi Video : PM मोदींच्या इन्स्टाग्राम व्हिडिओवर अभिजीत दिपकेंची कमेंट, 'तुमची त्वचा...'

याचवेळी पूनावाला यांनी, डावे उदारमतवादी हे त्यांना मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या गटात सामील होण्यास सांगत असल्याचेही ते म्हणाले. तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पूर्णपणे निराश झालो असून, गेली १२ वर्षे झाली आणि ते अपयशी ठरल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना हुकूमशहा कसे बनायचे हे नीट माहीत नाही. १२ वर्षे झाली. हुकूमशहा बनण्याऐवजी, ते दररोज रात्री एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आहेत. ज्या मुलांनी त्यांचा अपमान केला, ते घटनात्मक पदावर असतानाही त्यांच्या आईचा अपमान केला. अशा मुलांना ते खोडकर म्हणत, कृपया त्यांना माफ करा, असे आवाहन करत आहेत. हे आवाहन ते समाजाला, पोलिसांना आणि सर्वांना करत आहेत.

दुसरीकडे राहुल गांधी हे इंदिरा गांधींचे, नेहरूंचे वंशज आहेत. यांच्याकडून शिका, हुकूमशहा काय असतो ते. केरळमध्ये जेव्हा तीन इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी राहुल गांधींचा अपमान केला, तेव्हा गुन्हे दाखल करण्यात आले. तुमच्या सरकारने तर आंदोलकांवरील सर्व खटले मागे घेतले. केरळमध्ये ५,००० लोकांवर आरोप ठेवण्यात आले. कर्नाटकात पोस्टर दाखवल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला. रॅप कलाकारांवर खटला दाखल करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

pm narendra modi amit shah
Narendra Modi Record : 'मोदी मॅजिक'! PM मोदींच्या सेल्फी व्हिडिओचा 'डिजिटल धमाका'; 24 तासांत 30 कोटी व्ह्यूजसह रचला नवा जागतिक विक्रम!

काँग्रेसचा इतिहास बघा. नेहरूंनी भाषण स्वातंत्र्यावर निर्बंध लादले. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. इंदिरा गांधींनी तर आवाज उठवणाऱ्या खासदारांना तुरुंगात टाकले? जेव्हा संत आणि ऋषीमुनी निषेधासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना गोळ्या कोणी घातल्या? इंदिरा गांधींनी. असे म्हणत, १२ वर्षे झाली आणि मोदी अजूनही हुकूमशहा बनू शकले नाहीत. तुम्ही या डाव्या-उदारमतवाद्यांच्या सर्व आशा-अपेक्षांवर पाणी फेरलात, तुम्ही अपयशी ठरलात, अशी टीका काँग्रेसवर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com