Shivsena: शिवसेना पक्ष-चिन्हाचा आता १५ दिवसांत होणार अंतिम फैसला! सुप्रीम कोर्टाचे संकेत

Shivsena: शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? याबाबत सध्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी सुरु आहे. गेल्या दोन अडीच महिन्यापासून यावर युक्तीवाद सुरु आहे.
Shivsena Case_Supreme Court
Shivsena Case_Supreme Court
Published on: 
Updated on: 

Shivsena: शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? याबाबत सध्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी सुरु आहे. गेल्या दोन अडीच महिन्यापासून यावर युक्तीवाद सुरु आहे, पण आता पुढील पंधरा दिवसांत यावर अंतिम निर्णय देखील येईल, असे संकेत सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. त्यामुळं शिवसेना नेमकी कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे हे लवकरच स्पष्ट होईल.

कोर्टात सुनावणी सुरु

शिवसेनेच्या पक्ष-चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान कोर्टानं सूचक विधान केलं आहे. कोर्टानं यासंदर्भात तोंडी उल्लेख केला आहे. सुप्रीम कोर्टात आज पश्चिम बंगालच्या एसआयआर प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी प्रकरणं आलं. यावेळी कोर्टानं तोंडी सांगितलं की, येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत शिवसेनेची सुनावणी पूर्ण करायची आहे.

Shivsena Case_Supreme Court
Shivraj More: "संकटात सापडलेल्या मुलीच्या मदतीसाठी...." शिवराज मोरेंचं नवनाथ बन यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण; कायदेशीर कारवाईचाही दिला इशारा

म्हणजेच शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या सुनावणी पूर्ण करुन पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची बाजू मांडली जाईल, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. म्हणजेच पुढच्या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून सुनावणी दरम्यान नेमकं काय काय घडलं? याचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर निकाल राखून ठेवला जाऊ शकतो जो ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळं पुढील पंधरा दिवसांतच शिवसेना कोणाची यावर अंतिम शिक्कामोर्बत होण्याची शक्यता आहे.

Shivsena Case_Supreme Court
Gokul Election: सहा महिने कडवटपणा असणाऱ्या महायुतीचा शेवट गोड; चंद्रकांत पाटलांची गोकूळ संदर्भात महत्वाची घोषणा

दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून याप्रकरणावर सुनावणी सुरु असून आधी याचिकाकर्ते उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यानंतर एकनाथ शिंद यांच्यावतीनं नीरज किशन कौल यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. त्यामुळं पुढच्या आठवड्यात ठाकरेंकडून एक रिजॉईंडर देखील त्यांच्या याचिकेत दाखल होणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com