Congress Support Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठींबा, उद्धव ठाकरेही दिल्लीत जाणार

Sonam Wangchuk Protest : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठींबा वाढत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी काँग्रेसचा आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे.
Congress Support Sonam Wangchuk Protest
Congress Support Sonam Wangchuk Protest sarkarnama
Published on
Updated on

Congress News : नीट परीक्षा पेपर लीकनंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या विरोधात काॅक्रोज जनता पार्टीने केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात मागील 20 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते उपोषणला करत आहेत. त्यांच्या प्रकृती ढासळली असल्याची माहिती आहे. दरम्यान, आता त्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठींबा मिळत आहे.

वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत काँग्रेस अखेर आपली भूमिका स्पष्ट करत त्यांना थेट पाठींबा दिला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केल आहे.

काँग्रेस सरकारवर टीका करताना म्हटले की, गेल्या दीड महिन्यांपासून धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत असून सरकार यावर कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाही.

वांगचुक यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. अभिजीत दिपके यांनी काँग्रेसने पाठींबा द्यावा, असे आवाहन केले होते. मात्र, काँग्रेसकडून भूमिक घेतली जात नसल्याचे त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका करण्यात येत होते. अखेर काँग्रेसच्या सरचिटणीसांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वांगचुक यांना पाठींबा दिला आहे.

Congress Support Sonam Wangchuk Protest
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरे मैदानात, सरकारवर हल्लाबोल; 'आंदोलकांना लोळवायला...'

उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

सोनम वांगचुक यांना उद्धव ठाकरेंनी पाठींबा दिला होता. त्यांच्यासोबत ते फोनवर देखील बोलले होते. आता वांगचुक यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. 20 जुलैला ते दिल्लीला जातील आणि आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती आहे.

Congress Support Sonam Wangchuk Protest
Shivsena UBT News : 'कॉक्रोचच्या' आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ; उद्धव ठाकरे दिल्लीला जाण्याच्या तयारीत, राहुल गांधींना आवाहन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com