Shivsena UBT News : 'कॉक्रोचच्या' आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ; उद्धव ठाकरे दिल्लीला जाण्याच्या तयारीत, राहुल गांधींना आवाहन

Cockroach Janta Party protest news : दिल्लीतील आंदोलनांत सहभागी होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधींना देखील सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Uddhav Thackeray Delhi visit
Uddhav Thackeray Delhi visitSarkarnama
Published on
Updated on

Cockroach Protest Maharashtra Support : नीट परीक्षेविरोधात अभिजित दीपिकेच्या कॉक्रोच पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे.

दिल्लीत 20 जुलैला होत असलेल्या आंदोलनात जिथे असतील त्या ठिकाणाहून आंदोलनांना पाठिंबा देत मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन करीत 'कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बळ दिले आहे. त्यासोबतच दिल्लीतील आंदोलनांत सहभागी होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधींना देखील सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली. नीट परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. एकादा व्यक्ती असमर्थ असेल तर त्याला बदलण्याची गरज आहे. त्यासोबतच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात कमीपणा काय? असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला.

Uddhav Thackeray Delhi visit
Maharashtra Live Update : घुले हत्या प्रकरणात एसआयटीला सहकार्य करणार - बजरंग सोनवणे

'कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला त्यांनी महाराष्ट्रातून बळ दिले आहे. त्यासोबतच दिल्लीतील आंदोलनांत सहभागी होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधींना देखील सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विरोधी पक्षाला सध्या खूप काम आहे.

सध्या जागोजागी भ्रष्टाचार दिसत आहे. सत्ताधारी पक्षाला पक्ष फोडाफोडीत रस आहे. दुसरीकडे लक्ष दिले जात नाही. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यांनी उपोषण सोडावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Uddhav Thackeray Delhi visit
Operation Tiger : राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'? एका आमदाराला 20 कोटींची ऑफर; उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्याचा मोठा दावा

हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागे झाले पाहिजे. नागपुरात 18 जुलैला रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनात मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यासोबतच एखाद्या विषयावर राज्यातील सर्वच पक्षांनी एकत्रित यायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray Delhi visit
uddhav thackeray : मातोश्रीवरील चाणक्य गाफील राहिल्याने शिंदेंनी गेम केला; विधीमंडळातील 'त्या' कागदाने फिरले राजकारण, पवारांनी केले ते ठाकरेंना का जमले नाही?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com