

West Bengal TMC MLA Madan Mitra Convoy Attack News : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यापोठापाठ टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता. या घटना ताज्या असतानाच आता तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार मदन मित्रा यांच्या वाहनावर जमावाकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.
त्यांच्या ताफ्यावर जमावाकडून अंडी फेकण्यात आली आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली असून या घटनेला आमदार मदन मित्रा यांनी भाजप-समर्थित समाजकंटकांना जबाबदार धरलं आहे. तर भाजपा नेत्याने या घटनेवर प्रतिक्रिया देत हा हल्ला स्वतः मदन मित्रा यांनी घडवून आणल्याचा आरोप केला.
टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता. खासदार बॅनर्जी यांच्यावर सोनारपूरमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करत अंडी फेकत त्यांचा शर्ट फाडला. तसेच ‘चोर, चोर’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. ज्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी, ही घटना भाजपने घडवून आणल्याचा आरोप केला होता.
तर टीएमसीचे ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर देखील हुगळी जिल्ह्यातील चंडीतला येथे पोलिस स्टेशनच्या समोर हल्ला झाला होता. त्यांच्यावर देखील दगडफेक करण्यात आली होती. ज्या हल्ल्यानंतर कल्याण बॅनर्जी थेट रस्त्यावर कोसळले होते. तर त्यावेळी देखील ‘चोर-चोर’च्या घोषणा देत जमावाने त्यांना काळे झेंडेही दाखवले होते. या घटनांमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली होती. तर भाजप आणि टीएमसीच्या नेत्यांसह कार्यकर्तेही आमने-सामने आले होते.
या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता टीएमसीचे ज्येष्ठ आमदार मदन मित्रा यांच्या वाहनावर जमावाकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. ही घटना आरियादाहा परिसरात घडली असून या घटनेचा आता एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात मित्रा यांच्यावर काही नागरिकांच्या रोषाचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान आता आमदार मदन मित्रा यांनी यावर भाष्य केलं असून हल्ला झाला त्यावेळी आपण गाडीत नव्हतो. मात्र त्यांच्या चालकाला मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा हल्ला भाजप-समर्थित समाजकंटकांनी केल्याचे म्हटलं आहे. तर भाजप नेत्यांनी हा आरोप धूडकावून लावत हा हल्ला स्वतः मदन मित्रा यांनी घडवून आणल्याचा दावा केला आहे. तसेच हा हल्ला फक्त स्वतः संरक्षण मिळू शकेल या शक्यतेतून घडवून आणल्याचाही आरोप मंत्री अर्जुन सिंह यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.