Rahul Gandhi Vs Trinamool Congress : राहुल गांधी अन् TMC मध्ये जुंपली; ‘कठुआ ते कोलकाता’वरून गोखले भडकले

Kathua-Kolkata RG Kar Medical College West Bengal : आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार व हत्येच्या प्रकरणाने तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
Rahul Gandhi, Saket Gokhale
Rahul Gandhi, Saket GokhaleSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरजी कर मेडिकल कॉलेजमधील प्रकरणावरून बुधवारी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. त्यावरून आता राहुल आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जुंपली आहे. राहुल यांच्या अप्रत्यक्ष टीकेचा टीएमसीच्या नेत्यांनी समाचार घेतला आहे.

पश्चिम बंगालमधील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून बंगालमधील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. राहुल गांधी यांनीही बुधवारी ट्विट करत या घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केले.

Rahul Gandhi, Saket Gokhale
Assembly Election 2024 : ठरलं तर! शरद पवारांचे डावपेच, काँग्रेसची तरुण फळी आणि उद्धव ठाकरेंचा चेहरा...

राहुल यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेस आणि ममता सरकारवर निशाणा साधल्याची चर्चा आहे. त्यामध्ये त्यांनी कठुआ ते कोलकाता असा उल्लेख तृणमूल नेत्यांना पटलेला नाही. त्यावरून टीएमसीचे राज्यसभेचे खासदार साकेत गोखले यांनी पलटवार केला आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

कोलकाता येथे ज्युनियर डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देश स्तब्ध आहे. पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत आहेत. हाथरथ ते उन्नाव आणि कठुआ पासून कोलकातापर्यंत महिलांविरोधात सातत्याने वाढत असलेल्या घटना रोखण्यासाठी प्रत्येक पक्ष, घटकांनी एकत्रितपणे गंभीर विचार करत ठोस उपाययोजना करायला हवेत.

Rahul Gandhi, Saket Gokhale
Rahul Gandhi : राजनाथजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती! राहुल यांची जागा चुकली, काँग्रेस भडकली, सरकारचे उत्तर...

साकेत गोखलेंचा पलटवार

खासदार गोखले यांनी राहुल यांच्यावर पलटवार करताना त्याला विडंबनाची उंची गाठल्याचे म्हटले आहे. त्यांनी कठुआ या शब्दावरून राहुल यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे म्हटले आहे की, आरजी कर रुग्णालयातील घटनेबाबत काल त्यांच्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, कठुआ ते कोलकाता.

कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपांच्या समर्थनार्थ रॅली काढणाऱ्या लाल सिंगचे काँग्रेसने स्वागत केले होते. एवढेच नव्हे तर लोकसभेचे तिकीटही दिले. ‘कठुआ-कोलकाता’.. सिरिअसली राहुल गांधी?, असे म्हणत गोखलेंनी राहुल यांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com