Fake Universities : सावधान! प्रवेश घेण्याआधी UGC ने दिला विद्यार्थ्यांना मोठा इशारा, देशभरात 32 ‘फेक’ विद्यापीठे! यादीत महाराष्ट्रातील दोन विद्यापीठं

fake universities in maharashtra : दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट समिटमध्ये गलगोटीयाज विद्यापीठाचा कारनामा समोर आल्यानंतर आता यूजीसीकडून बोगस संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
UGC
UGCsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील 32 बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.

  2. या यादीत दिल्लीतील 12 आणि महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांचा समावेश असून मागील दोन वर्षांत संख्या 20 वरून 32 झाली आहे.

  3. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी UGCच्या अधिकृत संकेतस्थळावर यादी तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News : दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट समिटमध्ये गलगोटीया विद्यापीठाने चिनी रोबोट खरेदी करून स्वतः विकसित केल्याचे खोटे नाटे सांगितले होते. पण यानंतर चीनने याबाबत खुलासा केल्यानंतर जगभर गलगोटीया विद्यापीठाची छी तू झालीच पण देशाचे नाव ही जगभर उचललं गेलं आहे. यानंतर आता किमान देशातील विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मोठे पाऊल उचलले आहे.

आयोगाने देशातील बोगस विद्यापीठांची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यात मान्यता नसलेल्या 32 विद्यापीठांची नावे समोर आली असून यात महाराष्ट्रातील नागपूर अन् सोलापुरचे कनेक्शन उघड झाले आहे. नागपूर अन् सोलापुरमधील प्रत्येकी एक विद्यापीठ समोर आल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.

आयोगाने बोगस विद्यापीठांची यादी प्रसिद्ध करताना वाढत चाललेल्या बनावट विद्यापीठांच्या जाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी 8 राज्यांमध्ये बनावट विद्यापीठे होती ती वाढून आता आता 12 राज्यात पोहचल्याचे नमुद करत शिक्षण माफियांनी बनावट विद्यापीठांची संख्या 20 वरून 32 केल्याचे सांगितले आहे.

UGC
Supreme Court UGC stay : सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा धक्का, युजीसीच्या नव्या नियमांबाबत दिले महत्त्वाचे आदेश

यूजीसीच्या यादीनुसार, महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा यात समावेश आहे. नागपुरातील राजा अरेबिक विद्यापीठ तसेच सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ हे बनावट असल्याचे यूजीसीने सांगितले आहे.

बनावट विद्यापीठांच्या यादीनुसार, दिल्लीत सर्वाधिक 12 बोगस विद्यापीठे असून त्याखालोखाल यूपीमध्ये 4, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पुदुच्चेरी, पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 2, अरुणाचल प्रदेश, हरयाणा, झारखंड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 1 असे बोगस विद्यापीठ असल्याचेही यूजीसीने विद्यार्थी व पालकांना दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे.

दरम्यान आता या विद्यापीठांना केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारकडून मान्यता मिळालेली नसल्याचे उघड झाले आहे. तर त्यांना कोणतीही पदवी देण्यासाठी अधिकृत करण्यात आलेले नाही, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे. तर विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश घेण्यापूर्वी यूजीसीने यूजीसीच्या संकेतस्थळावर जावून बोगस विद्यापीठांची पूर्ण यादी नक्की तपासावी, असे आवाहन केले आहे.

दिल्लीतील बोगस विद्यापीठ

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्स, कर्मशियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, वोकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनीअरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, अध्यात्मिक युनिव्हर्सिटी, वर्ल्ड पीस ऑफ युनायटेड नेशनल युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनीअरिंग, माउंटेन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोल्यूशन

UGC
Vineet Joshi UGC Executive Chairman : 'UGC'च्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी मिळालेले विनीत जोशी आहेत तरी कोण?

FAQs :

1. UGCने किती बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे?
UGCने देशातील 32 बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.

2. कोणत्या राज्यांतील विद्यापीठांचा जास्त समावेश आहे?
दिल्लीतील 12 आणि महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांचा या यादीत समावेश आहे.

3. बोगस विद्यापीठांची संख्या किती वाढली आहे?
मागील दोन वर्षांत ही संख्या 20 वरून 32 पर्यंत वाढली आहे.

4. विद्यार्थ्यांनी काय खबरदारी घ्यावी?
प्रवेश घेण्यापूर्वी UGCच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यापीठाची मान्यता तपासावी.

5. बनावट विद्यापीठात प्रवेश घेतल्यास काय धोका असू शकतो?
अशा संस्थांकडून मिळालेली पदवी वैध नसू शकते आणि भविष्यात नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com