Union Minister Sanjay Kumar Case: केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला दणका,'लूकआऊट' नोटीसनंतर कोर्टानंही जामीन फेटाळला, बंदी साई भागीरथ 'सरेंडर'

Sanjay Kumar Son Surrender: केंद्रीय मंत्री संजय कुमार यांना मोठा धक्का बसला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने पॉक्सो कायद्यातंर्गत एका प्रकरणात त्यांचा मुलगा बंदी साई भागीरथ याला कोणतेही अटकपूर्व अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला.
Sanjay Kumar Son  .jpg
Sanjay Kumar Son .jpgSarkarnama
Published on
Updated on

Hyadrabad News: केंद्रीय मंत्री संजय कुमार यांना मोठा धक्का बसला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने पॉक्सो कायद्यातंर्गत एका प्रकरणात त्यांचा मुलगा बंदी साई भागीरथ याला कोणतेही अटकपूर्व अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला आहे. भागीरथ हा पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी आहे. त्यामुळे त्याचा अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांचा पुत्र बंदी भगीरथ याने पोलिसांकडे जात आत्मसमर्पण केलं आहे.

साई भागीरथ याच्याविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती.या प्रकरणातील पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर 8 मे रोजी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी साई भगीरथ याच्याविरोधात लूकआऊट नोटीस काढल्यानंतर विविध ठिकाणी छापेमारीही सुरू ठेवली होती.

तेलंगणा उच्च न्यायालयात या प्रकरणी शनिवारी(ता.16) सुनावणी पार पडली. या प्रकरणातील न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले की,पॉक्सो कायद्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला अंतरिम संरक्षण दिले जाऊ शकत नाही. भागीरथच्या अटकेवर स्थगिती देण्याचा आदेश देऊ शकत नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं.आता या प्रकरणातील अंतिम निर्णय पुढील सुट्टीकालीन खंडपीठावर अवलंबून असणार आहे.

पीडितेच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत साई भगीरथ हा त्यांच्या अल्पवयीन मुलीसोबत संबंधात होता. त्याने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपही पीडितेच्या आईकडून करण्यात आला आहे. याच प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे.पोलिसांनी याप्रकरणी पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Sanjay Kumar Son  .jpg
NCP internal conflict : दोनवेळा पंख छाटले, गुपचूप शरद पवारांना भेटले, योग्य वेळी बोलण्याचं सूचक विधान : पटेल-तटकरे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत?

भगीरथवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. भगीरथने तेलंगणा हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. पण हायकोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आणि त्याला दिलासा मिळाला नाही. हायकोर्टाच्या या निकालानंतरच बंदी संजय कुमार यांनी आपण आपल्या मुलाला पोलिसांसमोर हजर राहण्यास आणि तपासाला सहकार्य करण्यास सांगितल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर बंदी संजय कुमार यांचा चिरंजीव बंदी भगीरथ याने पोलिसांकडे जात आत्मसमर्पण केलं आहे.

Sanjay Kumar Son  .jpg
Pune BJP Politics: पुण्यातील नव्या कॅन्सर हॉस्पिटलला स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या वडिलांचं नाव: भाजपच्या भिमालेंनी गुपचूप उरकले नामकरण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com