अखेर ठरलं : उत्पल पर्रीकर आज मोठी घोषणा करणार

भाजपने उत्पल पर्रीकर यांना पणजीतून तिकीट नाकारल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.
Narendra Modi, Amit Shah and Utpal Parrikar
Narendra Modi, Amit Shah and Utpal Parrikar Sarkarnama

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) आज मोठी घोषणा करणार आहेत. त्यांना भाजपने पणजी विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारले असल्याने ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना भाजपने दोन मतदारसंघांचा पर्याच दिला आहे. पण पर्रीकर धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Goa Election 2022)

गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरूवारी उमेदवारी यादी जाहीर केली असून, पर्रीकरांना डावलण्यात आले आहे. (BJP Denied Ticket to Utpal Parrikar) पणजीतून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना भाजपने तिकिट दिले आहे. यामुळे उत्पल पर्रीकर यांना भाजपने डावलल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्रीकर यांनी पणजीतूनच तिकीट देण्याची मागणी केली होती. (Goa Political News)

Narendra Modi, Amit Shah and Utpal Parrikar
अखंडपणे 50 वर्षे प्रज्वलित असलेली 'अमर जवान ज्योत' आज विझणार; मोदी सरकारचा निर्णय

पर्रीकर यांच्याकडून उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज (शुक्रवारी) दुपारी पत्रकार परिषदेत ते आपला निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे. दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने भाजपच्या गोटातही चर्चेला उधाण आलं आहे. ते पणजी मतदारसंघातून अपक्ष लढत बंडखोरी करणार की भाजपला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांकडून उमेदवारी मिळवणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपची ऑफर स्वीकारण्याचा पर्यायही त्यांच्याकडे आहे.

दरम्यान, गोव्यातील अद्याप सहा जागांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातील दोन जागांची ऑफर पर्रीकर यांना देण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर उत्पल यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यातून निश्चितपणे मार्ग निघेल, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही केला आहे. त्यामुळे आता उत्पल हे या जागांबाबत काय निर्णय घेणार, हे एक-दोन दिवसांत समजेल.

Narendra Modi, Amit Shah and Utpal Parrikar
हरला तरी काळजी नको! उत्पल पर्रीकर यांच्यासाठी भाजपचा असा आहे खास 'प्लॅन'

पणजी वगळून इतर ठिकाणाहून निवडणूक लढल्यानंतर पराभव झाला तरी भाजपने उत्पल यांच्यासाठी खास प्लॅन केल्याचे एनडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. उत्पल यांना 2027 च्या निवडणुकीवेळी राजकारणात लॉन्च करण्याचा प्लॅन भाजपने आखला आहे. याबाबत उत्पल यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे ते इतर ठिकाणी लढले आणि हारले तरी त्यांना संघटनेत मोठे स्थान दिले जाईल, असे सुत्रांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. (Utpal Parrikar News Updates)

दरम्यान, पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते तसेच, संरक्षण मंत्रीही होते. त्यांच्या मृत्यूने गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पर्रीकर हे तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आता मतदारसंघावर त्यांचे पुत्र उत्पल यांनी दावा सांगितला आहे. पणजीत मागील दोन महिन्यांपासून ते प्रचार करीत आहेत. त्यांनी मागील आठवड्यात पक्ष नेतृत्वाला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. आता मागे वळून पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे गोवा भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. आपसह इतर राजकीय पक्षांनीही त्यांना उमेदवारीची ऑफर दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com