Vande Mataram : बंगालमधील विजयानंतर मोदी सरकारचा पहिला ऐतिहासिक निर्णय; ‘वंदे मातरम्’साठी कायद्यात महत्वपूर्ण बदल...

National Honour Act amendment India : कायद्यातील प्रस्तावित बदलानंतर वंदे मातरम् साठी या तरतुदी लागू होतील. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीचा जयघोष बनलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत.
Vande Mataram equal legal status with the national anthem under the National Honour Act.
Vande Mataram equal legal status with the national anthem under the National Honour Act.Sarkarnama
Published on
Updated on

Union Cabinet decision India : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयानंतर झालेल्या केंद्र सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ‘वंदे मातरम्’ बाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ ला आता राष्ट्रगीताप्रमाणेच समान दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट, 1971' (The Prevention of Insults To National Honour Act, 1971) या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून मंत्रिमंडळाने त्यास मंजूरी दिली आहे.

सुधारित कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतालाही राष्ट्रगीताप्रमाणेच सर्व नियम आणि प्रतिबंध लागू होतील. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल. सध्याच्या कायद्याममध्ये राष्ट्रगीताप्रमाणेच राष्ट्रीय ध्वज आणि संविधानाची अपमान केल्यास तुरुंगवास आणि दंडात्मक शिक्षेची तरतूद आहे.

Vande Mataram equal legal status with the national anthem under the National Honour Act.
TVK Vijay government : राजकीय धमाका; काँग्रेसकडून अधिकृत घोषणा, लोकसभा-राज्यसभेचंही प्लॅनिंग सांगितलं, महत्वाची अट ठरणार गेमचेंजर

कायद्यातील प्रस्तावित बदलानंतर वंदे मातरम् साठी या तरतुदी लागू होतील. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीचा जयघोष बनलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यापार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. मागील वर्षीच संसदेत ‘वंदे मातरम्’ वर चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यानही काही सदस्यांनी ही मागणी केली होती.

बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी १९८० मध्ये लिहिलेल्या आनंदमठ या कादंबरीत ‘वंदे मातरम्’ हे गीत प्रसिध्द झाले होते. १९३७ मध्ये पहिल्यांदाच काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ या गीताच्या पहिल्या दोन कडव्यांचा स्वीकार केला आणि त्यानंतर हे गीत क्रांतीकारकांचे प्रेरणास्त्रोत बनले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेत ‘वंदे मातरम्’ ला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला.

Vande Mataram equal legal status with the national anthem under the National Honour Act.
West Bengal Violence : बंगालमध्ये हिंसाचार वाढताच ज्ञानेश कुमारांनी काढले आदेश; TMC कार्यालयाला आग, तोडफोड, तिघांचा मृत्यू, काय-काय घडलं?

काय आहे शिक्षेची तरतूद?

‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट, 1971' कायद्यामध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रीय ध्वज किंवा संविधानाचा अवमान केल्यास तीन वर्षांच्या तुरुंगवास किंवा दंडात्मक कारवाई किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास कमीत कमी एक वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. आता ‘वंदे मातरम्’ बाबतही याच तरतुदी लागू होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com