Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना राज्यपालांकडून धक्का; विधानसभा बरखास्त

Mamata Banerjee West Bengal Politics : गेल्या १५ वर्षांची सत्ता गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेत आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. ज्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला.

  2. राज्यपालांनी पश्चिम बंगाल विधानसभा बरखास्त करण्याचा आदेश दिला.

  3. या निर्णयामुळे बंगालमध्ये मोठे राजकीय संकट निर्माण झाले.

West Bengal Politics : गेल्या १५ वर्षांची सत्ता गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट आक्रमक पवित्रा घेत आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, असे जाहीर केले. तसेच हा जनादेश नसून फसवणूक आहे. हवं तर राज्यपालांनी मला पदावरून हटवावे, मी त्याची वाट पाहत असल्याचे म्हटले होते. या घटनेला अद्याप २४ तासही होत नाही तोच राज्यपालांकडून पश्चिम बंगालची विधानसभा बरखास्त करण्याचा नवीन आदेश दिला आहे. यामुळे ममता दीदींना जोरदार धक्का राज्यपालांकडून देण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

नुकताच पश्चिम बंगालचा निकाल अनपेक्षित लागला. ज्यात ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या सत्तेला भाजपने सुरूंग लावला. तर त्यांचाही पराभव झाला. यानंतर कालीघाट येथे पार पडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या हत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर पराभवाचे खापर फोडले. तसेच भाजपने 'निवडणूक लुटल्याचा' खळबळजनक आरोप केला.

या दरम्यान आता राज्यपाल आर. एन. रवी यांनी मोठा निर्णय घेत पश्चिम बंगालमधील विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेचे कलम १७४ नुसार नवा आदेश काढत विधानसभा बरखास्तीचे निर्देश दिले आहे. राज्यपालांनी कलम १७४(२)(ब) अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून, राज्य विधानसभा तात्काळ प्रभावाने विसर्जित केली. यामुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे.

Mamata Banerjee
Mamata Banerjee news : जिव्हारी लागणाऱ्या पराभवानंतर ममता बॅनर्जींच्या दोन महत्वाच्या घोषणा; घटनात्मक पेच निर्माण होणार का?

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिल्यानंतर, राज्यपालांनी विधानसभा बरखास्त करण्याचे कठोर पाऊल उचलली आहेत. तर आता मुख्य सचिवांनी याबाबत अधिसूचना जारी केली असून हा आदेश आज गुरूवार (ता.७ ) पासून अंमलात येईल.

ममता बॅनर्जी यांचे आरोप काय?

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता फेटाळून लावत आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यांनी, हा निकाल 'जनादेश नसून एक षडयंत्र' असल्याचा आरोप केला.

तसेच मी हरलेली नाही आणि मी लोकभवनात जाणार नाही. सुमारे १०० जागांवर कौल भाजपने चोरला असा आरोप त्यांनी केला. तसेच 'इंडिया' आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी रस्त्यावर उतरू असेही त्या म्हणाल्या.

Mamata Banerjee
हा भाजप नेता होणार पं. बंगालचा मुख्यमंत्री? Mamata Banerjee Suvendu Adhikari, Bangal Election Result

FAQs :

1. ममता बॅनर्जी यांनी काय वक्तव्य केले होते
त्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचे म्हणाल्या होत्या

2. राज्यपालांनी कोणता निर्णय घेतला
पश्चिम बंगाल विधानसभा बरखास्त करण्याचा आदेश दिला

3. ममता बॅनर्जी यांनी जनादेशाबाबत काय म्हटले
हा जनादेश नसून फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला

4. या घटनेनंतर काय चर्चा सुरू आहे
राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना मोठा राजकीय धक्का दिल्याची चर्चा सुरू आहे

5. बंगालमध्ये पुढे काय होऊ शकते
राजकीय संघर्ष आणि घटनात्मक घडामोडी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com