Kolhapur News: कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; मुश्रीफांची सत्ता असलेल्या नगरपरिषदेसमोर मृतदेह ठेवून कर्मचाऱ्यांचा संताप

Kagal Municipal Council News: सविता आवळे यांच्या मृत्यूनंतर कागल नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन आणि सेवा-सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
Kagal Municipal Council News
Kagal Municipal Council NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कागल नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या ४१ वर्षीय सविता पिंटू आवळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या चौदा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला.

सविता आवळे यांच्या मृत्यूनंतर कागल नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन आणि सेवा-सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. संतप्त झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सविता आवळे यांचा मृतदेह थेट नगरपरिषद कार्यालयासमोर आणून ठेवला. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता. या नगर परिषदेवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व समरजीतसिंह घाटगे यांची सत्ता आहे.

“आमच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा पालिका कार्यालयासमोरील हा मृतदेह हलविणार नाही,” अशी आक्रमक भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. गेली वीस वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करूनही आरोग्य विम्यासह अन्य कोणत्याही मूलभूत सेवा-सुविधा मिळत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, तसेच त्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्याकडे लेखी आश्वासनाची मागणी केली.

Kagal Municipal Council News
Satara News: शिस्तभंग कारवाई सुरू असतानाच शिक्षणाधिकारी निलंबित; परीक्षा दिरंगाईचा ठपका

यावेळी भैया माने आणि पाणीपुरवठा सभापती प्रकाश गाडेकर यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तातडीने पालिका सभा बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी चार वाजता सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, या बैठकीतूनही कोणताही ठोस तोडगा निघाला नाही.

Kagal Municipal Council News
Teacher Recruitment : शिक्षक भरतीत मोठा ट्विस्ट! नियुक्तीआधी होणार ‘त्या’ उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, शिक्षण आयुक्तांचे कडक निर्देश

मृतदेह पालिका कार्यालयासमोर ठेवून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे कागल शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पालिका कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com