Ajit Pawar Politics | अजित पवारांनी मुंडेंना ठेवलं दूर, भुजबळांना पुन्हा डावललं ; तर शिवसेनेनं कांदेंना दिलं 'बळ'

Dhananjay Munde and Chhagan Bhujbal | वादग्रस्त राहिलेले माजी मंत्री धनंजय मुंडे व जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची एकाही समितीत नेमणूक न करण्यात आल्याने त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Ajit Pawar,Dhananjay Munde, Chhagan Bhujbal
Dhananjay Munde, Chhagan Bhujbal, Ajit Pawar.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : विधिमंडळ अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजल्यानंतर आता सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने वेगवेगळ्या आमदारांना या समितीत स्थान दिल्यात आले आहे. मात्र, वादग्रस्त राहिलेले माजी मंत्री धनंजय मुंडे व जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची एकाही समितीत नेमणूक न करण्यात आल्याने त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजित पवार यांनी जाणीवपूर्वक वादग्रस्त असलेले धनंजय मुंडे यांना समितीत स्थान न देता चार हात लांब ठेवल्याची चर्चा आहे. तर, आधीच मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांनाही कोणत्याही समितीत स्थान न देऊन पुन्हा भुजबळांची नाराजी अजित पवारांनी ओढावून घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार व भुजबळ यांच्यातील दूरावा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

Ajit Pawar,Dhananjay Munde, Chhagan Bhujbal
Nashik Kumbh Mela 2027: भाजपचे 'संकटमोचक' नाशिकच्या 'आखाड्यात'! कुंभात पहिलं शाहीस्नान कोण करणार?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात जेष्ठ असूनही छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं. त्यामुळे ते नाराज झाले. याआधी वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे रिक्त झालेले मंत्रिपद भुजबळांना दिले जाईल व त्यांची नाराजी दूर केली जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत असताना अजित पवारांनी मात्र धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदही स्वत:कडेच ठेवलं. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीत दिवसेंदिवस भर पडत असल्याची माहिती मिळत आहे.

भुजबळ समर्थक नाराज

धनंजय मुंडे यांचे रिक्त झालेले अन्न नागरी पुरवठा खाते यापूर्वी भुजबळांकडे होते. त्यामुळे ते छगन भुजबळ यांना दिले जावे अशी भुजबळ समर्थकांची इच्छा होती. मात्र तसे झाले नाही. त्यानंतर आता विधिमंडळ समितीतही त्यांना कोणतही प्रमुख पद किंवा सदस्यत्व देण्यात आलं नाही. त्यामुळे भुजबळांना पक्षाकडून वारंवार डावल्यात येत असल्याची भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहे.

Ajit Pawar,Dhananjay Munde, Chhagan Bhujbal
Maharashtra politics : अधिवेशन संपले तरी नाराजीनाट्य कायम; शिंदेंच्या सेनेतील नेत्यांचा सरकारविरोधी सूर !

भुजबळ विरोधक कांदेंना 'बळ'

छगन भुजबळ यांचे राजकीय विरोधक असलेले नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांची शिवसेनेच्या वतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे प्रमुख म्हणून सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवारांनी भुजबळांना डावलून माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद दिलं. त्यानंतर शिवसेनेने सुहास कांदे यांना समितीत स्थान दिलं आहे. त्यामुळे भुजबळांचे राजकीय विरोधक असलेल्या नेत्यांना शिवसेना व राष्ट्रवादीत 'बळ' मिळत असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com