Ajit Pawar : ग्रँड विजयानंतर दिल्लीत पाऊल ठेवताच अजितदादांनी केली मोठी घोषणा; म्हणाले,'डिसेंबरनंतर...'

Ajit Pawar Ncp Delhi tour : अजित पवार म्हणाले, आम्ही आधीच जाहीर केले होते की भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. मुख्यमंत्री त्यांचाच होईल. त्यांचे आमदार ज्या नेत्याला पाठींबा देतील. त्याला आमचा देखील पाठींबा असेल.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : महायुतीला विधानसभा निवडणुकीत बंपर यश मिळाले आहे. तब्बल 230 जागांवर महायुती विजयी झाली आहे. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर अजित पवार आज (गुरुवारी) पहिल्यांदाच दिल्लीत आले आहेत. आज त्यांची सरकार स्थापनेविषयी देवेंद्र फडणवीस, अमित शाह, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे.

दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवारांनी Ajit Pawar कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, डिसेंबरनंतर पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन घेणार असून पुढील जबाबदाऱ्या निश्चित करणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Ajit Pawar
Assembly Election: राजकीय पार्श्वभूमीचे 89 जण आमदार; 'घराणेशाही नको' म्हणणारा भाजपच विधानसभेत नंबर वन, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

मुख्यमंत्रि‍पदाबाबत फडणवीसांना Devendra Fadnavis पाठींबा देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, आम्ही आधीच जाहीर केले होते की भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. मुख्यमंत्री त्यांचाच होईल. त्यांचे आमदार ज्या नेत्याला पाठींबा देतील. त्याला आमचा देखील पाठींबा असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्रि‍पदासाठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे एकनाथ शिंदे यांनी देखील जाहीर केले आहे, असे देखील अजित पवार म्हणाले.

दिल्लीची निवडणूक लढणार

फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे संकेत प्रफुल पटेल यांनी दिले. तर, कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
Latur BJP News : लातूर जिल्ह्यात मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा; निलंगेकर, पवार अन् कराडही रांगेत..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com