Maharashtra drought declaration : बळीराजा होरपळला, सरकारचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर! दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर; नेतेमंडळी आक्रमक

Maharashtra drought declaration News : गेल्या काही दिवसापासून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे.
Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ambadas Danve News
Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे शेतातील पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्रमकपणे आंदोलन केले जात आहे. गेल्या काही दिवसापासून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी राज्य सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कलेची आहे. त्यासाठी नेतेमंडळी आक्रमक झाले आहेत.

राज्यातील मराठवाडा, विदर्भात दुष्काळाची परिस्थिती आहे. एकीकडे कर्नाटक राज्य सरकारने 130 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुहूर्त पाहत बसले आहेत. या विषयावर राज्य सरकारला सडेतोड उत्तर दिले पाहिजे. केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीही उठता बसता सरकारवर तोफ डागली पाहिजे, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.

राज्यात गेल्या 52 दिवसापासून पाऊस नाही. एवढे दिवस पाऊस नाही मग कोणते पीक जिवंत राहणार आहे? पीक संपलेले आहेत. कोरडवाहू पीक संपलं आहे. बागायती होते. त्याला वीज मिळाली नाही, तेही संपलं आहे. 5 ऑक्टोबरची वाट का बघता? कर्नाटकाने दुष्काळ जाहीर केला ना? तुम्ही का वाट बघत आहात? सरकार प्रश्नातून पळ काढत आहे. पण आम्ही पळ काढू देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाले.

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ambadas Danve News
Maharashtra Political Live Update : पालकमंत्री भरत गोगावले तटकरेंच्या घरी गणपती दर्शनाला, शिवसेना आमदाराची तीव्र नाराजी समोर

चार दिवसापूर्वीच आम्ही मराठवाड्याचा दौरा केला आहे. पीक पाण्याची परिस्थिती पाहिली आहे. उद्धव ठाकरे येऊन गेले. संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी दौरा केला. आम्ही दौरा करत आहोत. आम्ही या दौऱ्यांची तीव्रता अधिक वाढवू, असेही अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ambadas Danve News
Maharashtra Political Live Update : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला उद्धव ठाकरेंसह आमदार खासदार आंदोलन करणार

नांदेडमध्ये काँग्रेसचे घंटानाद आंदोलन

दरम्यान, कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी सोमवारी घंटानाद आंदोलन केले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. काँग्रेस नेते, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि ते कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते. कोरडा दुष्काळ जाहीर करावा, 100 टक्के पीकविमा द्यावा, विशेष पॅकेज द्यावे, ऊसाला प्रतिटन सहा हजार भाव जाहीर करावा, रब्बीच्या पेरणीसाठी 25 हजार रूपये द्यावे, या मागण्यासाठी घंटानाद आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ambadas Danve News
Mahayuti Government : 'राज्यातील महायुती सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही...': उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com