Amravati MLC Election : अमरावतीत उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच 'मातोश्री'वरून थेट फिल्डिंग; 'या' बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने संपूर्ण चित्रच बदलणार!

Teacher Constituency Politics News : अमरावती शिक्षक मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या किरण सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेले आहे.
Amravati MLC Election : अमरावतीत उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच 'मातोश्री'वरून थेट फिल्डिंग; 'या' बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने संपूर्ण चित्रच बदलणार!
Published on
Updated on

Mumbai News : अमरावती शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक यांची विधानपरिषदेची मुदत डिसेंबर महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या जागेसाठी लवकरच निवडणूक होणार असल्याने हालचालींना वेग आला आहे. या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या किरण सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेले आहे. त्यामुळे याठिकाणी सर्वच संघटनांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि विशेषतः स्थानिक शिक्षक परिषदांची मोठी पकड मानली जाते. त्यामुळे निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच 'मातोश्री'वरून थेट फिल्डिंग लावली असून निवडणुकीपूर्वीच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने या मतदारसंघातील संपूर्ण चित्रच बदलले आहे.

पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्याचा समावेश असलेला हा मतदारसंघ आहे. येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच हा मतदारसंघ भाजपसाठीही (BJP) तितकाच महत्त्वाचा आहे. भाजप समर्थक शिक्षक संघटनांचा येथे मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Amravati MLC Election : अमरावतीत उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच 'मातोश्री'वरून थेट फिल्डिंग; 'या' बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने संपूर्ण चित्रच बदलणार!
MLC election : एकनाथ शिंदेंच्या 'होम ग्राउंड'वरच भाजपचा दबदबा; ठाणे-पालघरची 'आमदारकी' शिवसेनेकडून जाणार?

अपक्ष म्हणून निवडून आलेल्या किरण सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेले आहे. त्यामुळे याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. अमरावती जिल्ह्यातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू यांनी शनिवारी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख पराग गुडघे आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

Amravati MLC Election : अमरावतीत उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच 'मातोश्री'वरून थेट फिल्डिंग; 'या' बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने संपूर्ण चित्रच बदलणार!
MLC Election : स्थानिकच्या रणधुमाळीतच भाजपकडून पुढच्या विधानपरिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा : खासदारांच्या बहिणीसह 3 नावांची चर्चा

2020 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप या दोन्ही मोठ्या आघाड्यांना धक्का देत अपक्ष उमेदवार म्हणून किरण सरनाईक यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या तरी येथे अपक्ष ताकदीचे वर्चस्व पाहायला मिळत होते. 2020 मध्ये श्रीकांत देशपांडे हे ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढले होते, मात्र त्यांचा पराभव झाला. तरीही, अमरावती विभागातील शिक्षक संघटनांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची आणि विशेषतः स्थानिक शिक्षक परिषदांची मोठी पकड मानली जाते. त्यामुळेच आगामी 2026 च्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आधीपासूनच मोठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Amravati MLC Election : अमरावतीत उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच 'मातोश्री'वरून थेट फिल्डिंग; 'या' बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने संपूर्ण चित्रच बदलणार!
Nashik MLC: नाशिक विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचा 'गेम'? या कारणाने महायुतीच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा...

अमरावती शिक्षक मतदारसंघात मतदारांचा कल हा पक्षापेक्षा 'उमेदवाराचा चेहरा आणि शिक्षकांच्या प्रश्नांवरील पकड' यावर अवलंबून असतो. सध्या येथे अपक्ष आमदार किरण सरनाईक यांचे वर्चस्व असले, तरी आगामी निवडणुकीत हे वर्चस्व खेचून घेण्यासाठी शिवसेना यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Amravati MLC Election : अमरावतीत उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच 'मातोश्री'वरून थेट फिल्डिंग; 'या' बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने संपूर्ण चित्रच बदलणार!
Nashik: भाजप बंडखोर गोकुळ गितेंच्या मागे उद्धव ठाकरेंची ताकद? एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाडण्यासाठी नाशिकमध्ये हालचाली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com