कोल्हेंनी शिवाजीराजेंची भूमिका का केली असे कधी विचारले का? : नाना पाटेकर

Why i killed gandhi | Amol kolhe news : शरद पवारांपाठोपाठ नाना पाटेकरांकडूनही अमोल कोल्हेंचे समर्थन
Amol Kolhe - Nana Patekar
Amol Kolhe - Nana Patekar Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिरुर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. यावरुन सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. अमोल कोल्हेंवर काही जणांनी टीका करत विरोध करत आहेत, तर, काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. याच वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे असे म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Sharad Pawar React on Amol Kolhe)

त्यापाठोपाठ आता जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत. त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तीस वर्षांपूर्वी मी देखील ही गोडसेंची भूमिका केली होती. पण आता मी भूमिका केली म्हणजे मी त्यांचं समर्थन करतो असं होतं का? समर्थन केले असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. मला विचारलं तुम्ही गोडसेची भूमिका का केली? ते माझं उपजीविकेचे साधन, यात माझी काय चूक आहे का? असा सवालही त्यांनी केला.

Amol Kolhe - Nana Patekar
Why I Killed Gandhi: शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

तसेच प्रत्येक गोष्टीचे भांडवल करायची गरज नाही, असा सल्लाही नाना पाटेकर यांनी कोल्हे यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्यांना यावेळी बोलताना दिला. पुढे ते म्हणाले, अमोल कोल्हे यांनी १३-१४ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. पण त्यावेळी तुम्ही त्यांना का विचारले नाही, ही भूमिका का केली? त्यावेळी कलाकार म्हणून कोल्हे यांना मान्य केले. मग आता कलाकार म्हणून वेगळा न्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

जितेंद्र आव्हाड कोल्हेंच्या विरोधात :

दरम्यान एका बाजूला शरद पवार आणि नाना पाटेकर यांच्यासारखे नेते आणि अभिनेते यांनी जरी डॉ. अमोल कोल्हे यांची पाठराखण करणारी भूमिका घेतली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे नेते अॅड. भूषण राऊत यांनी कोल्हे यांच्या विरोधी भूमिका घेतली आहे.

Amol Kolhe - Nana Patekar
आव्हाड संतापले; मी घरी जाऊन लोकांचे tv बंद करू का?

याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, कलाकार आणि माणूस म्हणून या दोन वेगवेगळ्या भूमिका असूच शकत नाही. एखाद्या माहित नसलेल्या चित्रपटामध्ये माहित नसलेला खलनायक साकारणे ही एक वेगळी गोष्ट आहे. पण महात्मा गांधी आणि नथुराम या दोघांचीही चारित्र्य सर्वांना माहित आहेत. ज्यावेळी तुम्ही नथुराम साकारता त्यावेळी त्याला तुमच्यामध्ये आणता ना? तुम्ही गांधीवर गोळ्या झाडणार ना? त्यामुळे नथुरामचा जो कोणी उदात्तीकरण करेल त्याच्या विरोधात मी राहणारच असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com