

Mumbai News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी SIT कडून चौकशी सुरु आहे. गेल्या दहा दिवसापासून या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणांत दहा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारणाची SIT कडून कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे आता येत्या काही तासातच SIT कडून काही महत्त्वाचे खुलासे करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. या सर्व खुलाश्यानंतर या प्रकरणाचा तपास कोणत्या नव्या वळणावर जाणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
खरातच्या मोबाईल डेटावरून सोमवारी क्रॉस चौकशीवर भर दिला जाणार आहे. रविवारी या प्रकरणी रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणीला प्राधान्य दिले जाणार आहे. मोबाईलमधील संपर्कांच्या आधारे नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खरातच्या दोन मोबाईलमधील डेटा हाती लागताच चौकशीला नवे वळण येणार आहे. कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी सुरू आहे.
मोबाईल डेटावरून संपर्कातील अनेक संशयित व्यक्तींची यादी तयार करण्यात येत आहे. त्यासोबतच त्या धर्तीवर सोमवारी पुन्हा खरातची झाडाझडती आणि क्रॉस चौकशी सुरू आहे. मोबाईलमधील संपर्कांच्या आधारे नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोबाईल डेटावरून संपर्कातील अनेक संशयित व्यक्तींची यादी तयार केली आहे.
संशयित व्यक्तींची यादी तयार करण्यात आली असल्यामुळे त्यामुळे SIT कडून पुढील काही तासांत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच खरातच्या मोबाईलमधून उघड होणाऱ्या संपर्कांची साखळी किती मोठी? तपास कोणत्या नव्या वळणावर जाणार याकडे लक्ष लागले आहे.
चाकणकर SIT चौकशीसाठी हजर राहणार नाहीत
दरम्यान, या प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना SIT चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे त्या सोमवारी चौकशीसाठी हजर राहतील असे सांगितले जात होते. मात्र, चाकणकर सोमवारी SIT चौकशीसाठी हजर राहणार नाहीत, अशी माहिती सूत्राने दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.