Ncp News : विधानसभा निवडणुका होताच शरद पवारांना धक्का, ‘तो’ बडा नेता तुतारीची साथ सोडून हातामध्ये घड्याळ घालणार

Ncp Ajit Pawar Group News: जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. आता ते लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे समजते.
Ajit Pawar Shard Pawar
Ajit Pawar Shard PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधनसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाचे केवळ 10 आमदार निवडून आले आहेत. त्यातच आता खान्देशातील एक बडा नेता आता शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. त्यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच ते तुतारीची साथ सोडून घड्याळ बांधण्याच्या तयारीत असल्याचे समजते. (Ncp News )

जळगावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाला काही प्रमाणात बळ मिळण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar Shard Pawar
Ruturaj Kshirsagar : 'ती' शपथ झाली पूर्ण, आमदार पुत्राने तब्बल पाच वर्षांनी डोक्यावर चढवला फेटा

याबाबत गुलाबराव देवकर यांनी देखील दुजोरा दिला आहे. देवकर यांनी मुंबईत राष्ट्रवादी (NCP) अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. दोन दिवसात अजित पवारांची भेट घेऊन गुलाबराव देवकर यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे पाच हजार कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे देवकर यांनी सांगितले

Ajit Pawar Shard Pawar
Devendra Fadnavis : "गृहमंत्रिपद आमच्याकडेच असावं असा हट्ट नाही..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

चिंतन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी सत्तेत जायला हवे, असे सांगितले होते. अजित पवार गटात जाण्याबद्दल निर्णय घेतला होता. कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अजित पवार गटात प्रवेश करत आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातले अनेक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, असे गुलाबराव देवकर यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar Shard Pawar
BJP Politics : भाजपच्या 'या' नेत्याचा निकालाबाबत 'अंदाज' तंतोतंत ठरला खरा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com