Akash More News : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आकाश मोरे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहे. मात्र, काँग्रेसने उमेदवार दिल्याने बिनविरोध निवडणुकीचा मार्ग बंद झाला आहे.
उमदेवारी अर्ज मागे घेण्याचा दिवशी कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ पण आपली एक अट असल्याचे सांगितले आहे.
आकाश मोरे यांनी म्हटले आहे की, बारामतीमध्ये अनेक मुद्दे आहेत. त्या मुद्यांच्या आधारे मी निवडणूक लढत आहे. अजित पवारांचा अपघाताचा प्रश्न आहे. त्यांच्या अपघातानंतर सरकारने गु्न्हा दाखल केलेला नाही. राज्य सरकारने त्या अनुषंगाने गु्न्हा दाखल केला तर माझी उमेदवारी लागोलाग मागे घेईल.
आकाश मोरे यांनी अजितदादांच्या अपघाताच्या गुन्हा दाखल करण्याच्या अटीला सरकार कसे प्रतिसाद देतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने ते काय निर्णय घेतात हे देखील महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आकाश मोरे यांनी भाजपने अजितदादांना त्रास दिला असा आरोप केला आहे.
आकाश मोरे म्हणाले, पिंपरी-चिंचवडच्या महापालिका निवडणुकीत आपण पाहिले असेल की भाजपच्या लोकांनी अजित पवारांवर खाल्याच्या पातळीवर जाऊन टीका केली. ते मुळे ते काहीसे अस्वस्थ झाले असावेत. फडणवीस यांनी आपल्या लोकांना तंबी द्यायला हवी होती मात्र ती त्यांनी दिली नाही.
आकाश मोरे हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र, पक्षाने त्यांना जो एबी फाॅर्म दिला आहे. त्यामध्ये तांत्रिक चूक असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश मोरेंच्या वडिलांचं नाव विजयराव मोरे असे असून देखील आकाश विश्वनाथ मोरे अशा नावाचा एबी फॉर्म देण्यात आलाय. त्यामुळे अर्ज बाद होण्याची चर्चा आहे. दरम्यान, या फॉर्ममध्ये दुरुस्ती करून आकाश मोरेंना नवीन फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.