बावनकुळेंनी पत्ते उघडले! मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वीच 'या' बड्या नेत्याच्या उमेदवारीचे दिले जाहीरपणे संकेत

Panvel Assembly constituency News : लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत चर्चा सुरु आहेत. या पुनर्रचनेवर अद्याप संसदेत मोहोर उमटलेली नाही.
 Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगवान घडामोडी घडत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत चर्चा सुरु आहेत. या पुनर्रचनेवर अद्याप संसदेत मोहोर उमटलेली नाही. मात्र, दुसरीकडे येत्या काळात होत असलेली विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचना गृहीत धरून भाजपने तयारी सुरु केली असल्याचे दिसत आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पनवेलमध्ये नव्या मतदारसंघासाठी विधानपरिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्या विधानसभा उमेदवारीचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काही दिवसापूर्वीच या ठिकाणी पनवेल महापालिकेची निर्मिती झाली आहे. पनवेलची लोकसंख्या वाढली असल्याने याठिकाणी शहरी व ग्रामीण असे दोन विधानसभा मतदारसंघ होऊ शकतात, ही शक्यता गृहीत धरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमप्रसंगी येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीविषयी भाष्य केले.

 Chandrashekhar Bawankule
Sangram Jagtap NCP : महायुतीतच धुसफूस; राष्ट्रवादीच्या हातातली जागा गेली, दिग्गज भाजपसमोर जगताप समर्थकांची नाराजी कितपत टिकणार?

यावेळी बावनकुळे यांनी पुनर्रचनेनंतर नवा पनवेल विधानसभा मतदारसंघ होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यासोबतच त्यांनी नव्याने निर्मिती झालेल्या मतदारसंघातून विधानपरिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्या विधानसभा उमेदवारीचे संकेत दिल्याने त्यामुळे या नव्या मतदारसंघातून संधी मिळण्याची अपेक्षा असलेल्या इच्छुकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

 Chandrashekhar Bawankule
Amravati MLC Election : विधानपरिषदेचा धुरळा : अमरावतीत भाजपसाठी धोक्याची घंटा! काँग्रेसने ताकद लावल्यास 'गेम' उलटणार

भाजपमधील उमेदवारी जाहीर करण्याची पद्धत पहिली तर उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे असताना मंत्री बावनकुळे यांनी केलेले या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषतः यापूर्वी बावनकुळे यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या मतदारसंघातून संधी मिळण्याची अपेक्षा असलेल्या इच्छुकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

 Chandrashekhar Bawankule
Rahul Patil News : महायुतीकडून रडीचा डाव, मतदान केंद्रावर कॅमेरे नेण्याचा प्रयत्न, आमदार राहूल पाटील यांचा गंभीर आरोप!

पुनर्रचना जाहीर होण्याआधीच बावनकुळेंनी आपले पत्ते उघड केल्यामुळे, भाजपने अंतर्गत पातळीवर लोकसभेच्या जागांसाठीचा गेम प्लॅन आधीच तयार केल्याचे स्पष्ट होत आहे. या विधानामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली असून, आगामी काळात जागावाटप आणि उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 Chandrashekhar Bawankule
Amravati MLC Election : विधानपरिषदेचा धुरळा : अमरावतीत भाजपसाठी धोक्याची घंटा! काँग्रेसने ताकद लावल्यास 'गेम' उलटणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com