

Parbhani-Hingoli MLC Election 2026 : महायुतीच्या उमेदवाराने विदेशातून असे काही डिव्हाईस आणले आहे, ज्यातून मतपत्रिकेचे फोटो काढले जाऊ शकतात. काल रात्रीपासून अशा डिव्हाईसेसचे वाटप नगरसेवकांना केले जात आहे, असा आरोप परभणीचे आमदार डाॅ. राहुल पाटील यांनी मतदानाच्या पुर्वसंध्येला केला. निवडणुकीआधीच पराभव दिसू लागल्यानेच महायुतीच्या उमेदवाराने रडीचा डाव खेळण्यास सुरूवात केली असल्याचेही पाटील यांनी माध्यमांना सांगितली.
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या मतदानाआधीच राहुल पाटील यांनी महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्यावर गभीर आरोप केले आहेत. निवडणूक हातातून गेल्यामुळे कशाही प्रकारे जिंकण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराकडून त्यांच्या नगरसेवकांना काही डिव्हाईसेस, पेन वाटप केले जात आहे. यामध्ये हिडन कॅमरे असून ते पेन, लाॅकेट, मोबाईलमधून मतपत्रिकेचे छायाचित्रण आणि फोटो काढण्यासाठी वापरले जाऊ शकतात.
या संदर्भात आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. हे हिडन कँमेरे, पेन जप्त करावे. नगरसेवकाना तपासणी करूनच मतदान केंद्रामध्ये सोडले जावे, अशी मागणीही त्यांनी केली. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत मतदान प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष व्हावी, यासाठी आज जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.
मतदान केंद्रांमध्ये मोबाईल, हिडन कॅमेरे तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर प्रतिबंध घालून मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी यावेळी केली. लोकशाही प्रक्रियेची पवित्रता अबाधित ठेवणे आणि प्रत्येक मतदाराला निर्भय वातावरणात मतदान करता यावे, हीच या निवेदनामागची भूमिका असल्याचे राहुल पाटील यांनी सांगीतले. यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. विवेक नावंदर, काँग्रेसचे उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंभिरे तसेच आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.