BJP: भाजपचा महाराष्ट्रात 'भीम पराक्रम'; ऐतिहासिक कामगिरीने शिवसेना, राष्ट्रवादीलाही धडकी

BJP News : भारतीय जनता पक्षाने अखेर महाराष्ट्रातील सदस्य नोंदणीचा दीड कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्रात सदस्यसंख्येचा असा विशाल आकडा आतापर्यंत कोणत्याही पक्षाला गाठता आला नव्हता, त्यामुळे ही भाजपची ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.
BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

BJP News : भारतीय जनता पक्षाने अखेर महाराष्ट्रातील सदस्य नोंदणीचा दीड कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्रात सदस्यसंख्येचा असा विशाल आकडा आतापर्यंत कोणत्याही पक्षाला गाठता आला नव्हता, त्यामुळे ही भाजपची ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. इतकेच नाही तर भाजपला लोकसभेमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी झाली आहे. भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 66 हजार 577 मते मिळाली होती. तर आता दीड कोटी सदस्य संख्या पूर्ण झाली आहे.

भाजप हा 'जगातला सर्वांत मोठी सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणवून घेत असतो. चीनच्या कम्युनिस्ट पक्षापेक्षाही ही सदस्य संख्या जास्त असल्याचा दावा पक्षातर्फे केला जातो आहे. महाराष्ट्रात यंदा लोकसभेत कामगिरी असमाधानकारक झाली तरी मागील निवडणुकीतील मतदानापेक्षा 775 मते जास्त मिळाली होती. विधानसभेत मात्र भरभरून यश मिळालेच शिवाय एक कोटी 72 लाख 93 हजार 650 मते झोळीत पडली.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
BJP Vs Uddhav Thackeray : अमित शाहांंवर केलेली टीका झोंबली; भाजप म्हणतं, ठाकरे संभ्रमात,एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत...

मात्र या मतांमध्ये शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या मतांचाही वाटा होता. त्यामुळे स्वत:ची ताकद वाढविण्यावर भाजपने भर दिला. आधी राज्यात एक कोटी सदस्य संख्या करण्याचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट टप्प्यात दिसताच भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी 50 लाखांनी वाढवून दीड कोटींवर नेले. आता हेही टार्गेट पूर्ण झाले आहे. नागरिकांना मिस कॉल देणे किंवा ऑनलाइन नोंदणी करून पक्ष सदस्यत्व घ्यायचे होते. मध्यंतरीच्या काळात उद्दिष्टपूर्तीसाठी काही आमदारांनी काम बाहेर देण्यासाठी संस्था शोधून काढली होती. पण त्यातील गोंधळानंतर दक्षता घेण्यात आली.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
BJP vs Shivsena : मंदा म्हात्रेंच्या पराभवासाठी झटलेला नेता पुन्हा शिवसेनेत; एकनाथ शिंदेंचा भाजपला धक्का

शिवसेना-राष्ट्रवादीलाही धडकी :

भाजपच्या या दीड कोटी सदस्य नोंदणीची शिवसेना, राष्ट्रवादीलाही धडकी बसली असल्याचे सांगितले जाते. आगामी काळात भाजप स्वबळवार लढल्यास या पक्षांना युतीतून बाहेरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो. या सदस्य नोंदणी मोहिमेत पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या चार विभागांची कामगिरी अत्यंत लक्षणीय झाली आहे. यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शिवसेना-राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com