

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, 'मी जेव्हा विचार करतो, हे कसं काय जमणार आहे, काय जमणार आहे. सगळे एनडीएमध्ये येणार आहे, ही सगळे इंडियामध्ये जाणार आहे, नक्की काय आहे याचा शोध बोध झालेला नाही. '
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, 'योग्य वेळीला जे सुनेत्राताईंनी सांगितलं, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सगळ्यांना ते कळेल. त्याआधी माझी खात्री आहे सुनेत्राताई आम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन काय काय घडतंय ते सांगतील.',
'सध्या मीडियामध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा 'मर्जर-मर्जर' खेळ सुरू आहे, मात्र हा खेळ दोन्ही बाजुने सांघिकपद्धतीने खेळायला पाहिजे. एकट्याने किंवा तुटक-तुटक कोणीही कसेही बोलणे योग्य नाही.', असे देखील त्यांनी सांगितले.
माझे मत माझ्या पक्षातील नेते, आमदार आणि जिल्हाप्रमुखांच्या भूमिकेसोबतच राहणार आहे, असे देखील ते म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले, माझे दोन नेते राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी किंवा तब्येतीची चौकशी करण्यासाठी भेटणे यात काहीही गैर नाही, कारण राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंध वेगळे असतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.