Cjp Protest : हात लावाल तर महाराष्ट्र बंद पाडू; आदित्य ठाकरेंचा रुद्रावतार, व्हॅनवर चढून घोषणाबाजी

CJP protest Mumbai latest news : पोलिसांच्या कारवाई विरोधात मनसे, ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरले असून आंदोलकांना सोडण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन केले.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील सीजेपीच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. या आंदोलनात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एन्ट्री झाली. शिवाजी पार्क परिसरात हे दोन्ही पक्ष आक्रमक झाले असून त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, शिवसेना भवनसमोर पोलिसांनी शिवसैनिकांना अटकाव केल्यानंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले. यावेळी त्यांनी पोलीस व्हॅन जागेवर अडवली. त्यासोबतच व्हॅनवर चढून जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी यावेळी शिवसैनिकांना हात लावाल तर महाराष्ट्र बंद पाडू, असा इशारा पोलिसांना दिला. तर आमदार अनिल परबही पोलिसांवर चांगलेच भडकले.

निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात शिवाजी पार्क परिसरात मनसे, ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांच्या कारवाई विरोधात मनसे, ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरले असून आंदोलकांना सोडण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे आंदोलनात उतरले होते. दुसरीकडे माजी मंत्री आदित्य ठाकरे व मनसेचे नेते अमित ठाकरे हे देखील रस्त्यावर उतरले होते.. यावेळी तीन ठाकरे बंधू रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व मनसे सैनिक रस्त्यावर उतरल्याचे पाहवयास मिळाले. या आंदोलनावेळी पोलीस ठाकरेंच्या शिवसैनिकात जोरदार राडा झाला.

रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सीजेपीने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला . त्यामुळे पोलिसांनी पुन्हा धरपकड केली. त्यामुळे शिवसेना भवनासमोर छावणीचे स्वरूप आले होते. मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह कार्यकर्त रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात सहभागी होण्यापासून कार्यकर्ते व पदाधिकारी रोखले जात होते.

Aditya Thackeray
CEC Gyanesh Kumar news : ज्ञानेश कुमार यांचा पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील महत्वाचा कार्यक्रम रद्द; वाद सुरू असतानाच काय घडलं?

दरम्यान, सीजीपीने पुन्हा रविवारी शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्याची घोषणा करताच पोलीस बंदोबस्त वाढवला. दुसरीकडे आंदोलनाच्या धास्तीमुळे आंदोलकांची धरपकड करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण चांगलेच तापले होते. पोलिसांच्या कारवाई विरोधात मनसे, ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांना सोडण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन केले .

Aditya Thackeray
MLC NEWS : मविआचा महायुतीला 'चेकमेट'! विधानपरिषदेसाठी रणनीती फायनल; लवकरच होणार अधिकृत घोषणा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com