Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना दिलासा, देवेंद्र फडणवीसाची मोठी घोषणा, बोरवेलवरील बंदी उठवली, फळबाळांना...

Farmers Relief : मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य आहे तिथे विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sarkarnama
Published on: 
Updated on: 

Devendra Fadnavis News : शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतातील बोरवेलवरील बंदी 15 डिसेंबरपर्यंत उठवली आहे. दरम्यान, जिथं फळबागा तिथेच बंदी उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेती नसलेल्या बोरवेलवरील बंदी कायम आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य आहे तिथे विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी केली. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. शेतकऱ्यांसमोर असलेले संकट आणि या संकटावर कशी मात करता येईल या संदर्भात त्यांनी बालपांडे यांच्यासोबत संवाद साधला. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना धीर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी गावात आलो आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतीमध्ये घेण्यात येत असलेल्या पिकांबद्दल व दुष्काळामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात चर्चा केली.

हवामान बदलामुळे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर पाऊसच पडला नाही आणि अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची हानी झाली आहे. या दोन्ही प्रसंगांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत दिली जात आहे. काटोल, नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणात पीक होत आहे. परंतु, बांगलादेशने निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.

या संदर्भात मिहान येथे मोठा प्रकल्प सुरू होत असून या पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे .शेतकरी अडचणीत येणार नाही, त्याची खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
BJP News : भाजपच्या महिला कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीला बेड्या; नेमके कारण आले समोर, पोलिसांच्या कारवाईने राजकारणात खळबळ

रब्बीचे पीक वाचवण्यासाठी प्रयत्न

रब्बीचे पीक वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, या संदर्भातही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली शेतीच्या संरक्षणासाठी कुंपण घालण्याची योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis
BJP Politics In Shirur : शिरूरमध्ये विरोधकांचा 'गेम ओव्हर'! भाजप सत्तेत, सत्तेची दोन्ही महत्त्वाची पदे पाचर्णे कुटुंबाकडे; नगरपरिषदेत विरोधकच उरला नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.