मुख्यमंत्री फिट : मंत्रिमंडळाच्या बैठकीला मानेच्या पट्ट्याशिवाय उपस्थित

Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली असल्याचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले.
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मागच्या काही दिवसांपासून प्रकृती कारणामुळे विश्रांतीवर आहेत. मात्र ते घरुन काम कार्यरत असल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. त्यांच्या याच प्रकृतीच्या कारणामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही, याबाबतही प्रश्नचिन्ह होते, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला आहे. मात्र दोन दिवसानंतरही ते सभागृहात उपस्थित न राहिल्याने विरोधकांनी त्यांच्या अनुपस्थित दुसऱ्याकडे चार्ज द्यावा अशी मागणी केली आहे.

मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) आता फिट असून ते त्यांनी आज मंत्रिमंडळाची बैठकही घेतली असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मला राज्याच्या जनतेला हेच सांगायचे आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक आहे. मंत्री मंडळाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री कॅबिनेटला ऑनलाईन उपस्थित राहिले आहेत. तसेच मुख्यमंत्री ठणठणीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Uddhav Thackeray</p></div>
तडजोडीचे राजकारण; विधानसभा अध्यक्ष बिनविरोध तर १२ आमदारांचे निलंबन मागे?

आव्हाड पुढे म्हणाले, मुख्यमंत्री अधिवेशनाला आले नाहीत म्हणून त्यांची मस्करी उडवली जात आहे. पण मागील काही दिवसांपासून संसदेत पंतप्रधान दिसले नाहीत. जे नियम पंतप्रधान मोदी यांना लागू आहेत ते सर्वांना असावे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना हाणला. याचबरोबर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सभागृहात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com