

Mumbai News : राज्याचा अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या सर्वत्र प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखालील एफडीएकडून गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यभरात भेसळ, अस्वच्छता आणि नियमभंग करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट व बारवर धडक कारवाई करण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर, एफडीएनं मोठमोठ्या फेमस ब्रँडवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. याच धास्तीमुळे आगामी सण उत्सवाच्या काळातही या कारवाया सुरू राहणार का,अशी चर्चा सुरू झाली आहे.
पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळातील गणेश मंडळांच्या महाप्रसाद,भंडारा यांच्यावरही एफडीएचं लक्ष असणार का? त्यांच्यासाठीही काही नियम बंधनकारक राहणार का याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, आता आयुक्त तुकाराम मुंढेंनीच याबाबत मोठा खुलासा केला आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे बुधवारी(ता.26) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना गणेशोत्सवातील दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद आणि भंडाऱ्यासाठीबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी एफडीएची भूमिका स्पष्ट केली.
गणेशोत्सवामधील गणेश मंडळाच्या महाप्रसाद आणि भंडाऱ्याकडे एफडीएचं लक्ष असणार का? याप्रश्नावर तुकाराम मुंढे यांनी एफडीएची कारवाई काही महाप्रसाद, भंडारा किंवा सण-उत्सव, ईद, गणेशोत्सव याबाबत नाही हे आपण सर्वांनी समजून घ्यायला हवं असं म्हटलं . इट इज अबाऊट रेग्युलेशन्स. ते नियमानुसार होतंय का याबाबत असल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
मुंढे म्हणाले, रेग्युलेशन्समध्ये फूड बिझनेसेसमध्ये प्रत्येकाने रजिस्टर्ड लायसन्स करणे अपेक्षित असून स्टँडर्ड रेग्युलेशन जे आधीपासूनचे आहेत त्यांचं पालन व्हावं, यामध्ये नवं असं काहीच नाही.
मात्र, विनापरवाना, विना स्टँडर्ड, विदाऊट प्रोटोकॉल होत असेल, तर ते नियमभंग करत आहे, मग ते फेस्टिव्ह सीजन असो वा नसो, ते महत्त्वाचं नसल्याचंही मुंढे म्हणाले. तसेच ही एक रुटीन प्रोसेस असून त्यात फेस्टिव्ह सीजन असो अथवा नसो असंही तुकाराम मुंढे म्हणाले.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची धुरा मे महिन्याच्या अखेरीस घेतली होती. त्यानंतर एफडीएनं राज्यभरात केलेल्या कारवायांसंदर्भातील माहिती आयोजित पत्रकार परिषदेत मुंढेंनी दिली. त्यांनी एफडीएकडून 31 जुलैपर्यंत अन्न क्षेत्रातील 3 हजार 100 हून जास्त आस्थापनांची तपासणी करण्यात आल्याचं नमूद केलं.
या एफडीएच्या या कारवायांदरम्यान, 165 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं. यावेळी एफडीएनं 750 हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच निलंबित परवान्यांपैकी जवळपास 105 जणांनी FDA आयुक्तांकडे अपील केलं असून त्यांपैकी 70 आस्थापनांना दिलासा देण्यात आल्याचंही मुंढे म्हणाले. उर्वरित प्रकरणांमध्ये अंतिम आदेशाची प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.