Rahul Gandhi Pune Visit : ‘पंतप्रधानांवर टीका म्हणजे देशावर टीका नाही’; राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी सरोदेंचा हल्लाबोल

Asim Sarode ‘future PM’ remark puts Rahul Gandhi Pune visit in focus : ‘पंतप्रधान म्हणजे देश नाही आणि भाजप म्हणजे देश नाही,’ असे म्हणत कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी एक्सवरील पोस्टमधून भूमिका मांडली; 22 ऑगस्टच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमापूर्वी राजकीय चर्चा रंगली.
Asim Sarode
Asim SarodeSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्या एका पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली आहे.

राहुल गांधी हे 22 ऑगस्ट रोजी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी येत असून, या पार्श्वभूमीवर सरोदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर थेट टीका केली आहे. राहुल गांधी यांचा उल्लेख ‘क्रांतिकारी नेता’ आणि ‘भारताचे भावी पंतप्रधान’ असा केल्याने ही पोस्ट विशेष चर्चेत आली आहे.

असीम सरोदे हे विविध राजकीय आणि संवैधानिक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. शिवसेना (Shivsena) पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांच्यासोबत मांडत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या भूमिका आणि धोरणांवरही ते सातत्याने सडेतोड भाष्य करताना दिसतात.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर असीम सरोदे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली. “पंतप्रधान म्हणजे भारत देश नाही आणि भाजप म्हणजे भारत देश नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.

Asim Sarode
RSS Mohan Bhagwat : मोहन भागवतांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी USCIRFची RSSविरोधात मोठी मागणी; राजनैतिक सन्मान न देणे अन् उच्चस्तरीय बैठका टाळा, भारत-अमेरिका संबंधांत नवा वाद

सरोदे यांनी पोस्टमध्ये म्हटले, “पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पदावर बसलेली व्यक्ती ठेवत नसेल, तर त्या व्यक्तीवर टीका करण्याचा आणि त्या व्यक्तीच्या वागणुकीचे विश्लेषण करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. पंतप्रधानांवर टीका म्हणजे देशावर टीका नाही. हे देशपातळीवर ठणकावून सांगणारा क्रांतिकारी नेता 22 ऑगस्टला पुण्यात येतोय.”

Asim Sarode
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana : आधार प्रमाणीकरणाआधी शेतकऱ्याचा मृत्यू; तरीही वारसांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ, सहकार आयुक्तांचा मोठा आदेश

या पोस्टच्या शेवटी त्यांनी राहुल गांधी यांचे वर्णन करताना पुण्यात “भारताच्या भावी पंतप्रधानांचे जणू स्वागत होत आहे,” असे म्हटले. तसेच, “रागाचा स्वॅग आता विद्यार्थ्यांनी डोक्यावर घेतलाय,” असेही सरोदे यांनी नमूद केले आहे.

‘छात्रों की गूंज’साठी अटी-शर्ती

राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांनी परवानगी देताना 30 अटी-शर्ती घातल्या आहेत. कार्यक्रमाची वेळ, गर्दीचे नियोजन आणि आक्षेपार्ह मजकूर किंवा घोषणाबाजी टाळण्यासंदर्भात आयोजकांना सूचना करण्यात आल्याची माहिती आहे.

काँग्रेस नेते पुण्यात तळ ठोकून

एकीकडे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुण्यात सक्रिय झाले आहेत, तर दुसरीकडे भाजपकडूनही राहुल गांधी यांच्या या दौऱ्याकडे लक्ष ठेवले जात आहे. असीम सरोदे यांच्या पोस्टमुळे राहुल गांधी यांच्या दौऱ्यापूर्वीच राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी चर्चेला उधाण

राहुल गांधी यांचा पुणे दौरा विद्यार्थी आणि युवकांशी संवादाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असला, तरी असीम सरोदे यांच्या पोस्टमुळे त्याला राजकीय धार मिळाली आहे. ‘पंतप्रधानांवर टीका म्हणजे देशावर टीका नाही’ हा मुद्दा पुढे करत सरोदे यांनी सत्ताधारी भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राज्याचे राजकारण ढवळून निघणार

राहुल गांधी पुण्यात येण्यापूर्वीच त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम आता केवळ विद्यार्थी संवादापुरता मर्यादित राहतो की त्याला व्यापक राजकीय रंग मिळतो, याकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com