Devendra Fadnavis : CM फडणवीस-एकनाथ शिंदे यांच्यात अधिकारावरून संघर्ष; एकाच पदासाठी दोघांना अतिरिक्त कार्यभाराचे आदेश

Maharashtra politics News : राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा प्रकार पुढे आला आहे. बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापकपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एकाच पदावर दोघांची नियुक्ती केली असल्याचे पुढे आले आहे.
Devendra fadnavis Eknath shinde
Devendra fadnavis Eknath shinde sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून तीनही पक्षात सातत्याने कुरबुरी होत असल्याचे पुढे आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या तीन पक्षातील मतभेद पुढे आले आहेत. मंत्रिपदापासून सुरु झालेली रस्सीखेच त्यानंतर मलईदार खात्यासाठी चढाओढ पहावयास मिळाली. त्यानंतर नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून तीन पक्षात असलेला वाद अद्याप मिटलेला नसतानाच आता बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदावर सीएम फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे एकाच पदावर दोन व्यक्तींची निवड करण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे.

राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा प्रकार पुढे आला आहे. बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापकपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एकाच पदावर दोघांची नियुक्ती केली असल्याचे पुढे आले आहे. तशास्वरुपाचे नियुक्ती पत्र सामान्य प्रशासन व नगरविकास खात्याकडून देण्यात आले आहे. त्यामुळे आता दोघांपैकी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra fadnavis Eknath shinde
BJP Politics: भाजप नेत्याने थेट पिस्तूलचं काढलं, हिंदुत्ववादी नेत्यालाच धमकावलं!

गेल्या काही दिवसापासून बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापकपद रिक्त आहे. त्यासाठी सीएम फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या पदावर आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचे पत्र दिले आहे तर दुसरीकडे याच पदावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नगरविकास विभागाकडून आश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचे म्हटले आहे. एकाच पदावर दोन व्यक्तींची निवड करण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे.

Devendra fadnavis Eknath shinde
Ajit Pawar : अजितदादांचा तानाजी सावंतांच्या मतदारसंघात मोठा धमाका; लढवय्या नेत्याची राष्ट्रवादीत एंट्री

बेस्ट महाव्यवस्थापक पदासाठी अतिरिक्त कार्यभार बीएमसीच्या दोन अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याने गोंधळ वाढला आहे. आता एकाच दिवशी दोन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याने कोणाच्या आदेशाचे पालन करायचं असं सुद्धा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकाऱ्यांवरून सुप्त संघर्ष असल्याचे यावरून या समोर येत आहे.

Devendra fadnavis Eknath shinde
Devendra Fadnavis : ‘स्थानिक’च्या निवडणुका 2017 प्रमाणेच होणार! सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांनीही केलं स्पष्ट...

गेल्या काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. इतकेच नव्हे, तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मुंबई ते दिल्ली वाढलेल्या गाठीभेटी सुद्धा यामध्ये चर्चा वाढवणाऱ्या ठरत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला आहे. एकाच पदासाठी एकाच दिवशी दोन आदेश आणि दोघांकडे अतिरिक्त कार्यभाराचा आदेश देण्यात आल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये सूप्त संघर्षाची ही नांदी आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Devendra fadnavis Eknath shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकासोबतच्या बैठकीत केला पत्ता ओपन; म्हणाले, 'मनसेसोबतच्या युतीचा निर्णय...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com