Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis Eknath Shindesarkarnama

Fadnavis Vs Shinde : शिंदे–फडणवीसांमध्ये दुरावा? नगरविकास खात्यावर नाराजी? मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘काही उपयोग नाही...’

Maharashtra politics : गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू होती. पण आता त्यांनीच यावर मोठा खुलासा केला आहे.
Published on

Summary :

  1. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

  2. शिंदे गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकींना अनुपस्थित राहिले आहेत.

  3. फडणवीस यांनी या चर्चांना उत्तर देत शिंदे यांच्याशी आपले संबंध चांगले असल्याचे सांगितले.

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. गेल्या काही दिवसापासून शिंदेही फडणवीस यांनी बोलवलेल्या बैठकांना दांडी मारत आहेत. यामुळेच या चर्चांना जोड मिळत आहे. अशातच आता फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, ‘माझं आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले आहेत’, त्यामुळे कोणाही काहीही केलं तरी काही उपयोग होणार नाही असे म्हटलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास खात्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत राज्यातील विविध आणि केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात नगरविकास खाते अपयशी ठरल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. तसेच फडणवीस यांनी सह्याद्रीवर आढावा बैठकही घेतली होती. ज्याला शिंदेंनी दांडी मारली होती. यामुळे शिंदे–फडणवीसांमध्ये दुरावा? निर्माण झाल्याचे बोलले जात होते.

Devendra Fadnavis Eknath Shinde
Maharashtra Politics : प्रवीण गायकवाड यांना शिवप्रेमींना फासले काळे

दरम्यान, प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावल्यास त्या खात्याच्या मंत्र्याने बैठकीला हजर असणं अपेक्षित होतं. मात्र फडणवीस यांनी बोलावलेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीला शिंदेंनी दांडी मारल्याने चर्चाना उधाण आलं होतं. यावरून आता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, आमच्यात दुरावा आहे. मी त्यांच्या खात्यावर नाराज आहे, असे शिंदे साहेब नाही बोलले ना मग सगळं ठिक आहे, संपला विषय.

माझं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं चांगलं आहे. आमच्यातील संबंधही चांगले आहेत. आमच्यात कोणताही दुरावा नाही. कोणीही कितीही आमच्यात विस्तव टाकण्याचा. काड्या टाकण्याचा, आऱ्या टाकण्याचा बांबू टाकण्याचा, काहीही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही. आम्ही सोबतच आहोत, असा दावा केला आहे.

याच मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, आमच्याकडे नगरविकास खातं आहे, इतरही खाते आहेत. आपला महाराष्ट्र नंबर एकला असून आता उद्योगही येत आहेत. महाराष्ट्राचा जीडीपी, स्टारटपही नंबर एकला आहे. याआधी अडीच वर्षाच्या कालावधी असो किंवा आता फडणवीस यांची दुसरी इनिंग, पहिला इनिंगही राज्याने पाहिली आहे. आम्ही फक्त विकासाच्याच मुद्द्याला घेऊन पुढे गेलो आहोत, असेच शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच नगरविकास विभागाच्या कामगिरीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाराजीनंतर शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या चर्चा फेटाळून लावत ती माहिती धांदात खोटी असल्याचे म्हटलं आहे. यामुळे आता नाराजीच्या चर्चांवर पडदा पडल्याचं बोललं जात आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde
Maharashtra Politics : अनेक राजकीय नेत्यांनी 'या' छोट्या गोष्टीतूनच निर्माण केले साम्राज्य...

FAQs :

प्रश्न 1: फडणवीस का नाराज असल्याची चर्चा आहे?
उत्तर: नगरविकास खात्यावरील कामकाजामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

प्रश्न 2: एकनाथ शिंदे बैठकींना का अनुपस्थित होते?
उत्तर: याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही, पण त्यामुळे वादाची शक्यता वाढली.

प्रश्न 3: फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: त्यांनी सांगितले की शिंदे यांच्याशी आपले संबंध चांगले आहेत आणि अफवांना काहीही महत्त्व नाही.

प्रश्न 4: शिंदे-फडणवीस वादाचा महाराष्ट्र राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर: राजकीय समीकरणांमध्ये तणाव वाढू शकतो, मात्र फडणवीस यांनी नातं चांगलं असल्याचं स्पष्ट केलं आहे.

प्रश्न 5: या चर्चांना जोड का मिळाली?
उत्तर: शिंदे यांनी काही बैठकींना दांडी मारल्यामुळे चर्चांना उधाण आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com