Maharashtra Government : CM फडणवीसांचा त्यांच्याच मंत्र्यांवर भरोसा नाय? गोपनीयता राखण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Maharashtra Government News : मंत्रिमंडळ बैठकांमधील गोपनीयता राखण्यासाठी राज्यात आता ई-कॅबिनेट प्रणाली लागू करण्यात येणार आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government News : मंत्रिमंडळ बैठकांमधील गोपनीयता राखण्यासाठी राज्यात आता ई-कॅबिनेट प्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मंत्र्याला आयपॅड देण्यात येणार आहे. या आयपॅडसाठीच्या 1 कोटी 16 लाख रुपयांच्या खर्चाला सरकारने मंजुरीही दिली आहे. ई-कॅबिनेट संकल्पनेनुसार, मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकांचे प्रस्ताव आयपॅडद्वारे पाहता येणार आहेत.

मंत्रिमंडळ बैठकांचे प्रस्ताव बैठकीपूर्वीच बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांची कानउघडणी देखील केली होती. पण त्याचवेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना यावर उपाय करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या 2 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीत कागदविरहित मंत्रिमंडळ अर्थात ई-कॅबिनेटबाबत सादरीकरण केले होते.

Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Case : 'देशमुख केसमधून मला मुक्त करा', कराडची मागणी

यात मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकांचे प्रस्ताव आयपॅडद्वारे पाहता येणार होते. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने हा प्रस्ताव स्वीकारला असून त्यासाठी आयपॅड खरेदी खर्चाला मंजुरीही दिली आहे. त्यानुसार 50 आयपॅड खरेदी केले जाणार आहेत. तसेच मंत्र्यांना आयपॅड हाताळण्यासाठी आणि वापरण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. याच संकल्पनेला ई-कॅबिनेट असे नाव देण्यात आले आहे.

Devendra Fadnavis
BMC Election : ठाकरेंना धक्का देण्याची सुरुवात 'मातोश्री'च्या दारातूनच! श्रीकांत शिंदेंची 'फिल्डिंग'

फडणवीसांचा त्यांच्याच मंत्र्यांवर भरोसा नाय का?

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीतील प्रस्वात बैठकीपूर्वीच बाहेर जात असल्याचे निदर्शनास आल्याने फडणवीस यांनी मंत्र्यांची कानउघडणी केल्याचे सांगितले गेले होते. त्यानंतर देखील त्यांनी थेट आयपॅडचाच निर्णय घेतल्याने त्यांच्याच मंत्र्यांवर त्यांचा भरोसा नाय का? असा सवाल विचारल जातोय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com