Dharashiv politics: धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्कप्रमुख उन्मेष पाटलांनी लावला कामाचा सपाटा; थेट दिल्लीतूनच लावली फिल्डिंग

Unmesh Patil News : नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठे यश मिळाले. त्यामुळे आगामी काळात वापरण्यात येणाऱ्या रणनीतीविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.
Unmesh Patil
Unmesh Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख व माजी खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. दिल्लीत त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी धाराशिव जिल्हयातील नेतेमंडळींशी चर्चा करीत या ठिकाणच्या कामांचा आढावा घेतला. त्यासोबतच भविष्यात होत असलेल्या निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचा वरचष्मा राहील यासाठी मोठे प्लॅनिंग केले आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठे यश मिळाले. त्यामुळे आगामी काळात वापरण्यात येणाऱ्या रणनीतीविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी नवनियुक्त धाराशिव लोकसभा संपर्क प्रमुख उन्मेष पाटील यांनी धाराशिव जिल्हयातील स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली. ही बैठक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यावर पार पडली. यावेळी उपस्थित असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारीबद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला. त्या वेळी नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Unmesh Patil
Eknath Shinde : उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार ; एकनाथ शिंदेंच्या एका विधानाने भाजपमध्ये खळबळ

यावेळी जिल्ह्यातील सध्यस्थितीबद्दल संपर्क प्रमुखांनी सर्व काही माहिती करून घेतली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेत तिकीट वाटपावेळी वादविवाद झाले होते. जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, त्यानंतर याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. विशेषतः धाराशिव झेडपीच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषा गायकवाड उपाध्यक्ष झाल्या आहेत. त्यासोबतच जिल्ह्यात आठ पैकी चार नगरपालिकेत शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले आहेत तर आठ पैकी पाच पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे (Shivsena) सभापती झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे.

Unmesh Patil
Uddhav Thackeray : जिल्हाप्रमुख पद नाकाराल्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली, माजी महापौर आता एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेणार

त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यात माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांची ताकद दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी देखील त्यांचे गड राखले आहेत.

कळंब, धाराशिव मतदारसंघात शिवसेना जनमानसात रुजलेली आहे. तुळजापूरमध्ये शिवसेनेला लक्ष देऊन कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्षाची बांधणी आवश्यक आहे. या तालुक्यात सुद्धा मोठा स्कोप आहे. तर मतदारसंघातील बार्शी आणि औसा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश धाराशिव लोकसभामध्ये असल्याने या ठिकाणी पक्षवाढीसाठी प्रयत्न आवश्यक आहेत, याबाबत उन्मेष पाटील यांना माहिती देण्यात आली.

Unmesh Patil
Shivsena UBT : ठाकरेंच्या खासदारांमध्ये फूट अटळ; मात्र ऑपरेशन टायगरसाठी पुरेशी संख्या जमेना?

येत्या काळात धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना वाढीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासोबतच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने विविध कामे केली जाणार असल्याचे नवनियुक्त संपर्कप्रमुख उन्मेष पाटील यांनी स्पष्ट केले.

Unmesh Patil
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, जळगावचे पाटील धरणार एकनाथ शिंदेंचा हात ; मुहूर्त ठरला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com