New Cylinder Scheme : युद्धाच्या सावटात सर्वसामान्यांना मोठा दिलासा! सरकारची 'डबल सिलेंडर' घोषणा; कोणाला होणार थेट फायदा?

LPG subsidy scheme 2026: युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारची डबल सिलेंडर योजना सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरली आहे. कोणाला फायदा होणार आणि योजनेचे फायदे काय आहेत ते जाणून घ्या.
government double cylinder scheme benefits
government double cylinder scheme benefitsSarkarnama
Published on
Updated on

LPG cylinder subsidy new scheme: जागतिक पातळीवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारने दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीवर निर्बंध आले, ज्याचा थेट परिणाम इंधन पुरवठ्यावर झाला. परिणामी अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आणि दरही वाढले.

या परिस्थितीचा परिणाम भारतावरही झाला असून एलपीजी गॅसची उपलब्धता काही प्रमाणात प्रभावित झाली आहे. अनेक ठिकाणी सिलिंडर मिळण्यात अडचणी येत असल्याने सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक आणि हॉटेल चालक यांना त्रास सहन करावा लागत आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकारने पर्यायी उपाययोजना सुरू केल्या आहेत. एलपीजीऐवजी पीएनजी गॅसचा वापर वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

government double cylinder scheme benefits
Ashok Kharat expose : मोठा खुलासा! जगासमोर आज येणार अशोक खरातचा विकृत चेहरा; तेजस्वी सातपुते उलगडणार मोठे गुपित!

याच पार्श्वभूमीवर सरकारने ‘डबल सिलेंडर’सारखा दिलासा देणारा निर्णय घेत स्थलांतरित कामगारांसाठी विशेष योजना सुरू केली आहे. स्वयंपाकासाठी गॅस सहज उपलब्ध व्हावा यासाठी 5 किलो क्षमतेचे छोटे एफटीएल सिलिंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे दररोज 1 लाखांहून अधिक सिलिंडरची विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारी माहितीनुसार, 23 मार्चपासून आतापर्यंत सुमारे 6.6 लाख छोटे सिलिंडर वितरित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सिलिंडर घेण्यासाठी पत्त्याचा पुरावा आवश्यक नाही, त्यामुळे स्थलांतरित कामगारांना मोठा फायदा होणार आहे. राज्य सरकारे आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग यांच्या माध्यमातून हे सिलिंडर थेट गरजूंपर्यंत पोहोचवले जात आहेत.

government double cylinder scheme benefits
Ashok Kharat Case: महिलांना आकर्षित करण्यासाठी विविध 'ट्रिक्स'; विकृत खरातची कबुली; 'एका वाक्यात दिलं उत्तर

पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात एलपीजीचा मोठा तुटवडा नसून एका दिवसात 51 लाखांहून अधिक घरगुती सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला आहे. एकूण मागणीपैकी सुमारे 95 टक्के मागणी ऑनलाइन बुकिंगद्वारे पूर्ण करण्यात आली आहे.

दरम्यान, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे. मार्चपासून 50 हजारांहून अधिक सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. तसेच 1,400 पेक्षा जास्त वितरकांना नोटिसा देण्यात आल्या असून 36 डीलरशिप निलंबित करण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com