Eknath Shinde on Jyoti Waghmare : ज्योती वाघमारेंना उमेदवारी, एकनाथ शिंदेंच्या एका वाक्याने जिंकलं कार्यकर्त्यांचं मन, म्हणाले, 'पक्षात...'

Rajya Sabha Election Shivsena : ज्योतीताई पक्षाची भूमिका,पक्षाचे काम ध्येय धोरणं आणि गेल्या साडेतीन वर्षात केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
Eknath Shinde  Jyoti Waghmare
Eknath Shinde Jyoti Waghmare sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : राज्यसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धक्कातंत्र देत ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेतून गजानन किर्तीकर, राहुल शेवाळे, शायना एन सी यांच्या नावाची चर्चा सुरू असताना ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

ज्योती वाघमारेंच्या उमेदवारीबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आमचा शिवसेना पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं. आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळेच ज्योतीताई वाघमारे या लाडक्या बहिणीला शिवसेनेनी संधी दिली आहे.

त्यांना देखील याची कल्पना नव्हती. परंतू शेवटी शिवसेनेत सर्व सामान्य कार्यकर्त्यांना संधी देतो. सर्वसामन्या कार्यकर्त्यांना मोठं करतो, असे देखील शिंदे म्हणाले.

ज्योतीताई पक्षाची भूमिका,काम, ध्येय धोरणं आणि गेल्या साडेतीन वर्षात केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवतील. शिवसेना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम करतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde  Jyoti Waghmare
congress crisis : कर्नाटकात पुन्हा सत्तासंघर्ष पेटला, डीके शिवकुमार यांनी CM पदाचा मुद्दा तापवला, थेट काँग्रेसच्या हायकमांडलाच दिला इशारा

शिवसेनेत नाराजी?

उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जाहीरपणे शब्द देऊनही आपल्या संधी मिळाली नाही, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. तसेच येथून पुढे कोणावर विश्वास ठेवणार नसल्याचे म्हटले आहे.

Eknath Shinde  Jyoti Waghmare
Mumbai BJP News: भाजपकडून मुंबई प्रदेशच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा, वडिलांना खासदारकी,आता उज्ज्वल निकमांच्या मुलालाही मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com