Shirish Chaudhari Case : नंदुरबारमध्ये खळबळ! शिवसेनेच्या माजी आमदारानं बनवलं भाजप आमदाराचं बनावट लेटरहेड? एकनाथ शिंदेंच्या शिलेदारावर गुन्हा दाखल

Former Shiv Sena MLA Shirish Chaudhari Fake Letterhead Case : राज्यात एकीकडे भ्रष्टाचार आणि बनावट गोष्टींवर विरोधक हल्ला करत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच माजी आमदाराचा धक्कादायक पराक्रम समोर आला आहे.
Former Shiv Sena MLA Shirish Chaudhari; Eknath Shinde
Former Shiv Sena MLA Shirish Chaudhari; Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Nandurbar News : राज्यात भ्रष्टाचारावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. सध्या 'मिसिंग लिंक' प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी महायुतीला घेरत आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माजी आमदाराचा धक्कादायक कारनामा उघड झाला असून, याप्रकरणी थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. माजी आमदार शिरीष चौधरी असे या शिंदे गटाच्या नेत्याचे नाव आहे.

शिरीष चौधरी यांनी भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या नावाचे बनावट लेटरहेड तयार केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी नंदुरबारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या लेटरहेडवर बनावट स्वाक्षरी करून जुन्या मंजूर कामांऐवजी नव्या कामांचा शासन निर्णय काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या नावाचे बनावट लेटरहेड तयार केल्याचे उघड झाल्यानंतर गावित यांचे स्वीय सहाय्यक अशोक शिवाजी बेहेरे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. आपल्या तक्रारीत त्यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी बनावट लेटरहेड तयार करून नव्या कामांचा शासन निर्णय काढल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर आता शिरीष चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Former Shiv Sena MLA Shirish Chaudhari; Eknath Shinde
Shiv Sena news : एकनाथ शिंदेंनी पुन्हा दाखवून दिली ताकद; अंबादास दानवेंच्या साथीने सत्तार, शिरसाट यांच्याकडून मोहीम फत्ते...

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहरातील विविध समाजांच्या सभागृहांसाठी आणि मंदिरांसाठी शासकीय निधी मंजूर करून आणला होता. मात्र, शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी यांच्यासह इतर चौघांनी मिळून त्यांचे बनावट लेटरहेड तयार करून मंजूर निधीपैकी ९ कोटी रुपयांचा निधी इतर वेगळ्याच कामांसाठी वर्ग केल्याचा आरोप आहे.

हे करण्यासाठी भाजप आमदार गावित यांच्या नावाचे बनावट लेटरहेड तयार करण्यात आले. तसेच त्यांची बनावट स्वाक्षरी करून नव्या कामांचा शासन निर्णय काढण्यात आला. या प्रकरणी आता माजी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी यांच्यासह इतर साथीदारांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या तक्रारीत स्वीय सहाय्यक बेहेरे यांनी म्हटले आहे की, भाजप आमदार विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री असताना नंदुरबार नगरपरिषद क्षेत्रातील विविध कामांसाठी ९.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला होता. त्यासाठी विविध असे १२ शासन निर्णय काढण्यात आले होते. दरम्यानच्या काळात गावित यांची प्रकृती बिघडली.

याच काळात माजी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी, नयन चौधरी, अकाउंटंट किशोर पाटील यांच्यासह इतर अज्ञात व्यक्तींनी हा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आमदार विजयकुमार गावित यांच्या नावाचे चार बनावट लेटरहेड तयार करण्यात आले. त्यावर गावित यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून ते मंत्रालयात सादर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Former Shiv Sena MLA Shirish Chaudhari; Eknath Shinde
Shinde Shiv Sena MP Modi cabinet : ब्रेकिंग: शिंदेंच्या शिवसेनेकडून मोदी मंत्रिमंडळात 'हे' खासदार घेणार मंत्रीपदाची शपथ? दोन नावं आली समोर!

यानंतर शासन निर्णयात शुद्धीपत्रकाद्वारे बदल करून एकूण ९ कोटी रुपयांचा निधी नंदुरबार शहरातील इतर कामांसाठी वर्ग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांवरून आता गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com