Shivaji Maharaj: शिवरायांच्या राजकीय रणनीतीची इस्रायललाही भुरळ! उच्चाधिकाऱ्यांनी केली मोठी घोषणा; फडणवीसांना केली विनंती

Shivaji Maharaj Statue in Israel : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती सातासमुद्रापार आधीच पोहोचली आहे. त्यातच आता त्यांच्या राजकीय रणनीतीची भुरळ इस्रायललाही पडली आहे.
Shivaji Maharaj
Shivaji Maharaj
Published on
Updated on

Shivaji Maharaj Statue in Israel : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती सातासमुद्रापार आधीच पोहोचली आहे. त्यातच आता त्यांच्या राजकीय रणनीतीची भुरळ इस्रायललाही पडली आहे. इथल्या उच्चाधिकाऱ्यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विशेष विनंती करण्यात आली आहे. भारत आणि इस्रायलमधील सांस्कृतीक संबंध अधिक मजबूत करण्याचा देखील हा एक प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे.

Shivaji Maharaj
Mahua Moitra: तृणमूलच्या २० बंडखोर खासदारांमध्ये युसुफ पठाणचाही समावेश! महुआ मोईत्रांनी सुनावलं; म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना...

नुकत्याच ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुंबईत इस्रायलचे राजदूत यानिव रेवाच यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यासंदर्भातील एका मोठ्या प्रोजेक्टची घोषणा केली. या प्रोजेक्ट अंतर्गत शिवरायांचा घोड्यावर बसलेला पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. रेवाच यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, आम्हाला चांगलच माहिती आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव काय आहे तसंच भारतासाठी ते का महत्वाचे आहेत. कल्पना ही आहे की, शिवरायांचा एक मोठा पुतळा बनवून तो इस्रायलला पाठवला जाईल. हा केवळ एका नियमित प्रकल्पाहून अधिक महत्वाचा आहे. हा दीर्घकाळ चालणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत भारतीय लोक देखील इस्रायलशी जोडले जातील. इस्रायलच्या एका मोठ्या शहरात हा पुतळा बसवण्याचा प्लॅन आहे.

Shivaji Maharaj
Maratha Andolan : विखेंच्या बंगल्यावर मराठ्यांचा ठिय्या! जरांगे अन् मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप

छत्रपतींचं हे स्मारक त्यांच्या वारशाला शोभेल असं बनवण्यासाठी इस्रायललनं ऐतिहासिक संदर्भ, कलात्मक सल्लामसलत आणि डिझाईनच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सहकार्य मागितलं आहे. यानंतर फडमवीसांनीही तात्काळ सहकार्याला हिरवा किंदील दाखवला आहे. तत्पूर्वी फडणवीसांना लिहिलेल्या एका पत्रात इस्रायली राजदूतांनी म्हटलं की, आम्हाला वाटतं की, इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायल आणि भारत यांच्या दरम्यान जवळचं नातं अधिक मजबूत करण्याची निशाणी असेल. महाराष्ट्र आणि ज्यू समुदयामध्ये ऐतिहासिक नातं पाहता असं स्मारक महत्वाचं ठरणार आहे. या दोन्ही समाजांचे वंशज आत इस्रायलच्या विकासात महत्वाचं योगदान देत आहेत.

यानिव रेवाच यांनी पुढे म्हटलं की, शिवरायांचा पुतळा उभारण्याचा हेतू हा जास्तीत जास्त इस्रायली नागरिकांना शिवरायांचं जीवन आणि कामगिरीची ओळख करुन देणं हे देखील आहे. मी भारतात जिथे कुठे जातो तिथं लोकांच्या डोळ्यात इस्रायल आणि आमच्या राष्ट्रीय नायकांप्रती सन्मान आम्हाला दिसतो. मला वाटतं की, आम्हाला इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महारांबाबत जास्तीत जास्त जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मैत्रीच्या याच भावनेतून मुंबईत इस्रायलच्या राजदुतांनी आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Shivaji Maharaj
Chhagan Bhujbal : साहेब निर्णय घ्या...! येवल्यात झळकले पोस्टर्स ; समर्थकांची नाराजी, छगन भुजबळ खरोखर निर्णय घेणार?

फडणवीसांनी व्यक्त केला आनंद

दरम्यान, इस्रायलच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण समर्थन दिलं आहे. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये फडणवीस यांनी म्हटलं की, ही मोठी बाती आहे. शिवराज्याभिषादिवशी शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय इस्रायलनं घेतला याबबात मी त्यांचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र सरकार या ऐतिहासिक कामासाठी मी पूर्ण पाठिंबा देण्यास आहे. जय भवानी, जय शिवाजी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com