Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा लाभ कुणाला मिळणार नाही? 21 लाख 97 हजार खाती अपात्र; 2,088 लोकप्रतिनिधींचा समावेश

21.97 lakh loan accounts found ineligible, including 2,088 elected representatives : सहकार विभागाची आकडेवारी समोर; सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांपासून महामंडळे, सहकारी संस्थांतील पदाधिकाऱ्यांची खातीही वगळली
Farmer Loan Waiver
Farmer Loan WaiverSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Farmer Loan Waiver Scheme : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या छाननीत तब्बल 21 लाख 97 हजार 666 कर्जदार अपात्र ठरले आहेत.

यामध्ये मंत्री, खासदार आणि आमदारांसह 2 हजार 88 लोकप्रतिनिधींच्या कर्जखात्यांचाही समावेश आहे. सहकार विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी (Farmer) कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करताना मोठ्या संख्येने कर्जखाती अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. सहकार विभागाच्या आकडेवारीनुसार, सरकारी अधिकारी-कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचारी, विविध महामंडळे आणि सहकारी संस्थांतील पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींची मिळून 21 लाख 97 हजार 666 कर्जखाती अपात्र ठरविण्यात आली आहेत.

या छाननीत मंत्री, खासदार, आमदारांसह तब्बल 2 हजार 88 लोकप्रतिनिधींची कर्जखाती योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरविण्यात आली आहेत. मात्र, या 2 हजार 88 खात्यांमध्ये मंत्री (Minister), खासदार आणि आमदार यांची स्वतंत्र संख्या किती आहे, याची माहिती सहकार विभागाने अद्याप जाहीर केलेली नाही.

Farmer Loan Waiver
BLO FIR : BLO कर्तव्यावरून दाखल गुन्हा रद्द; अध्यापनाच्या वेळेत शिक्षकांना निवडणूक कामे, उच्च न्यायालयाचे ताशेरे

राज्य सरकारने शुक्रवारी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे 6 लाख 22 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5 हजार 28 कोटी रुपयांचा लाभ जमा केला. कर्जमाफी आणि एकरकमी परतफेड योजनेच्या घटकांतर्गत आतापर्यंत एकूण 31 लाख 24 हजार कर्जखाती पात्र ठरल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. योजनेसाठी प्राप्त झालेल्या कर्जखात्यांची पात्रता तपासल्यानंतर अपात्र लाभार्थ्यांची मोठी संख्या समोर आली आहे.

Farmer Loan Waiver
Jyoti Waghmare Kutumbpramukh remark : उद्धव ठाकरेंनंतर आता मोदींसाठीही 'कुटुंबप्रमुख' शब्द; ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्याची चर्चा

लोकप्रतिनिधींची कर्जखाती अपात्र?

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषांनुसार लोकप्रतिनिधी तसेच सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. त्यामुळे छाननीदरम्यान अशा कर्जदारांची खाती पात्र लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आली. विशेष म्हणजे, 2 हजार 88 लोकप्रतिनिधींची खाती अपात्र ठरली असली, तरी त्यामध्ये मंत्री, खासदार आणि आमदार यांचे स्वतंत्र वर्गीकरण सहकार विभागाच्या उपलब्ध आकडेवारीत करण्यात आलेले नाही.

आकडेवारी काय सांगते?

योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 31 लाख 24 हजार खात्यांच्या तुलनेत जवळपास 22 लाख कर्जखाती अपात्र ठरली आहेत. त्यामुळे योजनेच्या लाभासाठी करण्यात आलेल्या छाननीची व्याप्ती आणि पात्रता निकषांची कठोर अंमलबजावणी यावर या आकडेवारीतून प्रकाश पडतो. दरम्यान, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच एकरकमी परतफेड योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून, सरकारने शुक्रवारी 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,028 कोटी रुपये जमा केले आहेत.

सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची सर्वाधिक खाती अपात्र

  • शासकीय अधिकारी-कर्मचारी : 11 लाख 75 हजार 742

  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील : 7 लाख 31 हजार 113

  • विविध महामंडळांमधील : 1 लाख 76 हजार 112

  • सहकारी संस्थांतील पदाधिकारी : 1 लाख 12 हजार 611

  • मंत्री, खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी : 2 हजार 88

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com