Maharashtra politics : राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार; भाजप बड्या मंत्र्यांच्या इशाऱ्याने खळबळ; शिवसेनेचा सणसणीत पलटवार!

Ganesh Naik’s latest statement News : येत्या दोन ते तीन महिन्यात राजकारणात बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार, असा दावा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केला.
Devendra Fadnavis And Eknath Shinde
Devendra Fadnavis And Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी फोडलेल्या ऑडिओ बॉम्बनंतर सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांवर आरोप केले जात असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवरून राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल, असे मोठे विधान भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी केले आहे. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांच्या या विधानांनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या चार दिवसापासून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता ठाण्यात प्रसार माध्यमाशी बोलताना मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी शिवसेनेच्या जिव्हारी लागणार वक्तव्य केले आहे. मी राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. 1990 पासूनचा इतिहास पाहिला तर मी जे बोलते ते खरे होते. सत्कर्म केल्यास आपल्याला चांगली फळे मिळतील, तर दुष्कर्म केल्यास त्याचे फळ विषारीच भोगावे लागतील, हा निसर्गाचा नियम आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात राजकारणात बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार, असा दावा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केला.

सामूहिक निर्णय घेतला जातो तेव्हाच उलथापालथ होते : गुलाबराव पाटील

या नाईक यांच्या विधानावर शिवसेनेचे (Shivsena) मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. उलथापालथ व्हायला काही तो भूकंप थोडीच आहे. जे व्हायचे असते ते ठरलेले असते आणि जे होईल ते आपण पाहूच, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता सस्पेन्स वाढला आहे. कोणाच्या भविष्य सांगण्यावर किंवा भाकितावर काही होईल, हे मानणारा मी माणूस नाही. जेव्हा सगळेजण मिळून सामूहिक निर्णय घेतात, तेव्हाच उलथापालथ होते, असे गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis And Eknath Shinde
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

राज्यातील महायुतीचे सरकार भक्कम : आनंद परांजपे

मंत्री गणेश नाईक यांच्या या विधानानंतर त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी टीका केली आहे. गणेश नाईक भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यासोबतच राज्याचे वनमंत्री आहेत. ते कधीपासून ज्योतिष बघायला लागले हे मला माहित नाही. राज्यातील महायुतीचे सरकार भक्कम आहे. राज्यातील जनतेने अभूतपूर्व असा जनादेश २०२९ पर्यंत महायुती सरकारला दिला आहे. त्यामुळे मला त्याबद्दल तरी काहीच वाटत नाही. महायुतीचे सरकार सध्या भक्कमपणे जनहिताचे कामे करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis And Eknath Shinde
Bjp Politician: भाजप नेत्याचा थाटच नादखुळा! मतदारसंघात स्वतः च्या प्रायव्हेट जेटनं फेरफटका; घराजवळच आहेत दोन हेलिपॅड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com