Ambadas Danve : मोठी बातमी! विधानपरिषद उपसभापती पदासाठी मविआचा उमेदवार ठरला; अंबादास दानवेंनी जाहीर केले नाव

Ambadas Danve announces Deputy Chairman candidate : विधानपरिषद उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची अंबादास दानवे यांनी घोषणा केली. जाणून घ्या निवडणुकीसंदर्भातील ताज्या राजकीय घडामोडी.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

महाविकास आघाडीने विधान परिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. संख्याबळ कमी असल्याची जाणीव असूनही आघाडीने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. यासाठी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार आणि शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक जग्गनाथ मोतीराम अभ्यंकर (जमू अभ्यंकर) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ही घोषणा करत त्यांच्या उमेदवारीचा अर्ज आज दाखल केला जाणार असल्याची माहिती दिली.

उद्या होणाऱ्या निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीची संख्या तुलनेने कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेणे महत्त्वाचे असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. आघाडीकडे सध्या केवळ 14 ते 15 सदस्यांचे पाठबळ असल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र निवडणूक लढवणे ही लोकशाहीची गरज असल्यामुळे उमेदवार उभा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Ambadas Danve
Nandurbar Student Death : विद्यार्थ्याचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू; एकनाथ खडसेंचा अधिवेशनात सवाल अन् मुख्याध्यापक, अधीक्षकाला अटक

जमू अभ्यंकर हे शिक्षण क्षेत्रातील अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले असून त्यांच्या अनुभवाचा विचार करूनच महाविकास आघाडीने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवरही दानवे यांनी भाष्य केले. शरद पवार यांचे नेतृत्व मोठे असून भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत आत्ताच अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीतील पक्ष एकत्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com