BJP-ShivSena dispute : डीसीसी बँकेच्या छाननीत महासंग्राम! केंद्रीय मंत्र्याच्या अर्जावर शिवसेनेचा जोरदार आक्षेप; भाजपकडूनही पलटवार!

Jalgaon DCC bank election News : जळगाव जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी तब्बल 402 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेदरम्यान विविध उमेदवारांच्या अर्जांवर नऊ जणांनी हरकती घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
Jalgaon District Bank Election
Jalgaon District Bank Electionsarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon News : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यापासून महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे वातावरण चांगलेच तापलेले आहे. दुसरीकडे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यानच भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद उफाळून आला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जांवर हरकती घेतल्याने दोन्ही पक्षांमधील राजकीय कुरघोडीची चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी तब्बल 402 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेदरम्यान विविध उमेदवारांच्या अर्जांवर नऊ जणांनी हरकती घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीच्या उमेदवारी अर्जावरही हरकत नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पवार कुटुंबाच्या उमेदवारीबाबत छाननीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी हरकत घेतली आहे.

Jalgaon District Bank Election
Maharashtra Live Update: PM मोदींची भेट घेतल्यानंतर शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले, 'दुष्काळात शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही...

मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांच्या अर्जांवर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी हरकत नोंदवली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी 402 अर्ज दाखल झाल्याने सुरुवातीपासूनच निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. मात्र, छाननीच्या टप्प्यावरच एकमेकांच्या उमेदवारांच्या अर्जांवर हरकती घेण्याच्या प्रकारामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

Jalgaon District Bank Election
Maharashtra Politics Live : ...तर मी सुद्धा MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग होईल:धनंजय मुंडे

या हरकतींमुळे काही उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे पुढील गणितही छाननीच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. छाननी प्रक्रियेनंतर वैध आणि बाद ठरलेल्या उमेदवारी अर्जांची यादी मंगळवारी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे कोणाचे अर्ज वैध ठरतात आणि कोणाचे अर्ज बाद होतात, हे उद्याच स्पष्ट होणार आहे.

Jalgaon District Bank Election
Maharashtra Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम; मंगेश चिवटे पक्षाकडून अर्ज भरणार : उदय सामंत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.