Raigad Politics : तटकरे कुटुंबात वाद? आदिती तटकरेंचं तिकीट कापण्यासाठी अनिकेत यांची मोर्चेबांधणी : पंचायत समिती सदस्याचा खळबळजनक आरोप

Aditi Tatkare and Aniket Tatkare : रोहा येथील सभेत बोलताना सुरेश मगर यांनी तटकरे कुटुंबातील कथित अंतर्गत मतभेदांवर थेट भाष्य केले. आदिती तटकरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळू नये, यासाठी अनिकेत तटकरे यांच्याकडून प्रयत्न करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
Aditi Tatkare | Aniket Tatkare | Raigad Politics
Aditi Tatkare | Aniket Tatkare | Raigad PoliticsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News, 17 Nov : रायगडच्या राजकारणात तटकरे कुटुंब सतत चर्चेत असतं, अशातच आता आदिती तटकरे यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळू नये, यासाठी त्यांचे बंधू अनिकेत तटकरे यांनीच मोर्चेबांधणी केल्याचा गंभीर आरोप रोहा पंचायत समितीचे सदस्य सुरेश मगर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

रोहा येथे काल झालेल्या सभेत सुरेश मगर यांनी जाहीरपणे हा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सभेत बोलताना सुरेश मगर यांनी तटकरे कुटुंबातील कथित अंतर्गत मतभेदांवर थेट भाष्य केले. आदिती तटकरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळू नये, यासाठी अनिकेत तटकरे यांच्याकडून प्रयत्न करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी सुरेश मगर यांनी अनिकेत तटकरे यांच्यावर निशाणा साधताना उपस्थित कार्यकर्त्यांसमोर एक सवाल उपस्थित केला. "जे स्वतःच्या बहिणीचे होऊ शकले नाहीत, ते तुमचे-आमचे आणि कार्यकर्त्यांचे काय होणार?" असा सवाल करत त्यांनी अनिकेत तटकरेंवर टीका केली.

Aditi Tatkare | Aniket Tatkare | Raigad Politics
Sunil Tatkare : दादांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची दांडी; तटकरेंनी कारणचं सांगितलं

शिवसेनेचा शेकाप होऊ नये म्हणून संबंध लांब ठेवा

दरम्यान, रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद नवा नाही. याच वादात आता मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी उडी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या कुरघुडीच्या राजकारणावर मोठे विधान केले आहे.

Aditi Tatkare | Aniket Tatkare | Raigad Politics
Tarali Project : अदानी समूहाला मोठा धक्का! पाटणमधील तारळी जलविद्युत प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश

विकास गोगावले यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना शेकापची आठवण करून दिली. शेतकरी कामगार पक्षाची आज काय परिस्थिती आहे. जिल्ह्यात सत्तेत असणारा शेतकरी कामगार पक्ष आज संपलेला आहे, अशी आठवण करून देत शिवसेनेचा शेतकरी कामगार पक्ष होऊ नये म्हणून आपली मैत्री थोडी लांब ठेवा अशी विनंती विकास गोगावले यांनी सेनेच्या नेत्यांना केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.