Bharat Gogawale : शासकीय कार्यक्रमात भाजपचा अजेंडा : भरत गोगावलेंकडून थेट राजीनाम्याची भाषा, तटकरेंचीही नाराजी

Bharat Gogawale Quit Ministerial Post : शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठा दावा करताना ते आपल्यालाच मिळणार असून तसा 'ग्रीन सिग्नल' मिळाला असल्याचे म्हटले होते.
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Raigad Political News : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. शिवसेनेचे आमदार तथा मंत्री भरत गोगावले यांनी, "उद्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या म्हटलं तरी मी तयार आहे," असे जाहीर वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. अलिबाग येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे येणार, अशी चर्चा होती. काही दिवसांपूर्वी गोगावले यांनी स्वतःच पालकमंत्रिपदासाठी 'ग्रीन सिग्नल' मिळाल्याचा दावा करत १५ ऑगस्टपूर्वी निर्णय होईल, असे संकेत दिले होते. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, अलिबाग येथील शासकीय कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाच्या आयोजनावरून महायुतीतच नाराजी उफाळून आली. शासकीय कार्यक्रमात भाजपचा अजेंडा राबवण्यात आल्याचा आरोप झाला. जिल्हा प्रशासनाने महायुतीतील इतर घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींना पूर्वकल्पना न देता निमंत्रण दिल्याने राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली.

Bharat Gogawale
Bharat Gogawale : रायगडचे राजकीय तापमान वाढले, पालकमंत्रीपदावर गोगावलेंचे सूचक वक्तव्य चर्चेत; 'मला ग्रीन सिग्नल'

याच पार्श्वभूमीवर गोगावले यांनी, "अडीच वर्षांच्या सरकारमध्ये मंत्रिपद सोडणारा मी एकमेव आमदार होतो. आजही आदेश मिळाला तर क्षणाचाही विलंब न लावता मंत्रिपदाचा राजीनामा देईन. जनता जोपर्यंत जबाबदारी देईल, तोपर्यंत काम करत राहीन," असे सांगत अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Bharat Gogawale
Bharat Gogawale : रायगडचे राजकीय तापमान वाढले, पालकमंत्रीपदावर गोगावलेंचे सूचक वक्तव्य चर्चेत; 'मला ग्रीन सिग्नल'

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून रस्सीखेच सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर हा प्रश्न मार्गी लागल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला होता. मात्र अद्याप पालकमंत्रिपदाची घोषणा न झाल्याने या मुद्द्यावरची चर्चा पुन्हा एकदा रंगली असून, गोगावले यांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यामुळे या राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com