

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू आहे.
माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी महायुतीला मोठा धक्का दिला आहे.
या निकालामुळे मंत्री नितेश राणेंच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Sindhudurg ZP Results News : जिल्हा परिषदच्या ४२ आणि पंचायत समितीच्या ८३ जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (ता.९) सुरू झाली आहे. सकाळी १० वाजल्यापासून आठही तालुक्यांमध्ये मतमोजणी होताना दिसत असून ३५९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. दरम्यान माडखोल जिल्हा परिषद मतदार संघातून धक्कादायक निकाल समोर आला आहे. येथे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना अपक्षांनी धक्का दिला असून मंत्री नितेश राणेंना मोठा झटका बसला आहे.
तळकोकणातील निकाल लागत असून कुठे विजय नोंदवला जात आहे. तर कुठे राज्यातील सत्ताधारी महायुतीला धक्के लागताना दिसत आहे. कणकवली तालुक्यातील तळेरे गटात मंत्री नितेश राणे यांनी लावलेल्या जोडण्या फळास आल्याचे दिसत आहे. येथे भाजपचा पहिला विजय झाला असून न राजेश जाधव हे ९४८ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण वरूणकर यांचा पराभव केला.
मात्र माडखोल जिल्हा परिषद मतदार संघातून धक्कादायक निकाल समोर आला आहे. येथून जिल्हा परिषदेवर शिवानी नाईक या अपक्ष उमेदवार निवडून आल्या आहेत. तसेच याच मतदारसंघात येणाऱ्या माडखोल पंचायत समितीमधून अवनी राऊळ व कलंबिस्तमधून प्रथमेश सावंत हे दोन्ही अपक्ष निवडून आले आहे.
हे तिन्ही अपक्ष उमेदवार भाजपचे बंडखोर असून त्यांना भाजपने डावलल्याने या उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते. पण आजच्या निकालात महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. निवडणूक प्रचारात अपक्ष उमेदवारांना अदृश्य शक्तीकडून रसद पुरवली जात असल्याचा आरोप युतीच्या नेत्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर अपक्षांचा हा ट्रेड लक्षवेधी ठरत आहे. तर या उमेदवारांना रसद पुरवणारी अदृश्य शक्ती कोण अशीही येथे चर्चा होताना दिसत आहे.
सावंतवाडी तालुक्यात अपक्षांचा बोलबाला सुरूच असून याचा फटका महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना बसताना दिसत आहे. भाजपचे तालुक्यातील वजनदार नेते महेश सारंग कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर लढत होते. ते पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. तेथे अपक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसूजा आघाडीवर आहे.
दरम्यान असाच निकाल माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातून लागला असून महायुतीला धक्का लागला आहे. येथे शिवानी नाईक या अपक्ष उमेदवाराने जिल्हा परिषद सदस्यपदाची निवडणूक जिंकली आहे. या निकालामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवारांना अदृश्य शक्तीकडून रसद पुरवली जात असल्याचे आरोप युतीच्या नेत्यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर माडखोल आणि परिसरात अपक्षांनी मिळवलेले यश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. अपक्ष उमेदवारांच्या या यशामुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून, पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या किती जागांसाठी निवडणूक झाली?
जिल्हा परिषदेच्या 42 आणि पंचायत समितीच्या 83 जागांसाठी निवडणूक झाली.
2. मतमोजणी कधी सुरू झाली?
आज सकाळी 10 वाजल्यापासून आठही तालुक्यांमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे.
3. माडखोल मतदारसंघात काय निकाल लागला?
माडखोल मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला असून अपक्ष उमेदवार विजयी ठरले आहेत.
4. या निकालाचा मंत्री नितेश राणेंवर काय परिणाम होईल?
या निकालामुळे त्यांच्या राजकीय ताकदीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
5. आज किती उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे?
एकूण 359 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.