

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदार फुटले असून आता त्यांचे आमदार देखील फुटतील असा दावा केला जात आहे. अशातच आता महाविकास आघाडीच्या बैठकीला 48 पैकी तब्बल 23 आमदारांनी दांडी मारल्याचे उघड झाले आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार फुटू शकतात असा दावा केला आहे. या दाव्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या पक्षातील काही आमदारांनी दुसऱ्यांदा पक्ष फुटीनंतर बोलावलेल्या बैठकीला दांडी मारली होती.
नुकताच ठाकरेंच्या पक्षातील नऊपैकी तब्बल सहा खासदारांनी वेगळी वाट धरत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असतानाच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरेंनी धक्का बसल्यानंतर जाग्या झालेल्या महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मविआची बैठक घेतली. मात्र या बैठकीला 48 पैकी तब्बल 23 आमदारांनी दांडी मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे हे आमदार फुटतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी ठाकरेंनी डिवचलं आहे. त्यांनी ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर आगामी काळात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार देखील फुटू शकतात असा दावा केला आहे. यावेळी नारायण राणे म्हटले, ‘ऑपरेशन झालं ना, सहा खासदार आले ना. आता आमचा आमचा हेतू साध्य झाला. आता आमचा हेतू साध्य झाला असून कुठून काय? आणि कोणी केलं? हे कशाला काढता, असा सवाल केला आहे.
तसेच यावेळी नारायण राणे यांना असे प्रवेश लोकशाहीसाठी धोकादायक ठरणारे नाहीत का असा सवाल केला असता, हे सर्व लोकशाहीसाठी धोकादायक आहे की नाही हे परिस्थितीनुसार कळेल. पण सर्व टायगर आता भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्याकडे तीनच खासदार आहेत. जे काही आहेत ते ठाकरेंना सोडणारे नाहीत आणि आम्ही त्यांना भाजपमध्ये घेणार नाही, आम्ही माणूस बघून घेतो, असा टोला लगावला आहे.
तर त्यांच्याकडे आता आमदार कुठे आहेत? अशी खोचक टीका करताना नारायण राणे यांनी, पुढचा नंबर हा आमदारांचा असणार आहे. खासदारांना जो मोबदला मिळाला, त्यानंतर तो आमदारही मागतील. ते म्हणणार आम्हाला मिळू दे. यामुळे आता ठाकरेंना सध्या बरं नाहीये, सोडात्यांना. तीन खासदारांना घेऊन बसू द्या त्यांना. पण आता बाळासाहेबांची आठवण येत असून उद्धवची नाही. वाईट वाटतं जो पक्ष सुरुवातीपासून पाहिला, त्याचा आज अस्त होताना मला बरं वाटत नाही, वाईट वाटतं असंही राणे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.