Devendra Fadnavis : फडणवीसांकडून कोकणासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा, नितेश राणेंचंही कौतुक; सुमारे २७ हजार कोटी रुपयांची होणार गुंतवणूक

Devendra Fadnavis On Nitesh Rane Over Dighi shipyard : कोकणात देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारले जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मंत्री नितेश राणे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
Maharashtra largest shipyard project Dighi Port; Devendra Fadnavis And Nitesh Rane
Maharashtra largest shipyard project Dighi Port; Devendra Fadnavis And Nitesh Ranesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कोकणातील सागरी विकासाला चालना देणाऱ्या दिघी बंदराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची आणि मोठी घोषणा केली. येथे देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारले जाणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मंत्री नितेश राणे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे म्हणत फडणवीस यांनी नितेश राणे यांचे विशेष कौतुक केले आहे.

मंगळवारी (ता.१५) मंत्रालयात कॅबिनेट बैठकीच्या नंतर पत्रकारांना ही माहिती देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मंत्री नितेश राणे देखील तेथे उपस्थित होते. यावेळी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांच्यात सामंजस्य करार झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून तब्बल १५ हजार लोकांना थेट आणि ९० हजार अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी हा करार करण्यात आला. तर येथे लढाई आणि कमर्शियलशिप या दोन्ही जहाजबांधणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Maharashtra largest shipyard project Dighi Port; Devendra Fadnavis And Nitesh Rane
Devendra Fadnavis: मनोज जरांगे अन् त्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच सविस्तर अन् थेटच बोलले; म्हणाले, सर्व मागण्या...

आत्तापर्यंत शिप बिल्डिंग या क्षेत्रामध्ये भारत ज्या प्रमाणात पुढे जायला हवा होता. पण तसे झालेले नाही. यामुळेच देशातील जहाजबांधणी क्षेत्राला अपेक्षित असलेली क्षमता वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया मेरीटाइम व्हिजन’मध्ये उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठीच ‘मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७’ पूरक ठरेल.

Maharashtra largest shipyard project Dighi Port; Devendra Fadnavis And Nitesh Rane
Devendra Fadnavis: फडणवीस अचानक दिल्लीला रवाना, अमित शहांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद; सरकारमध्ये नेमकं काय सुरु?

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे देशातील जहाजबांधणी क्षमतेपैकी सुमारे ४० टक्के क्षमता एकट्या महाराष्ट्रात या एका शिपयार्डच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. तर या शिपयार्डच्या उभारणीसाठी साधारण तीन वर्षांचा कालावधी लागणार असून सध्या आवश्यक परवानग्या घेतल्या जात आहेत. लवकरच या कामाला महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com