Shivsena Corporator Controversy : शिंदेंच्या नगरसेविकेकडे दोन शिधापत्रिका अन् दोन राज्यांतील तीन मतदार ओळखपत्रे? काँग्रेस महिला नेत्याचा खळबळजनक दावा

Shivsena Corporator Vs Congress Ex-Corporator : मुंबई महापालिकेच्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका रेखा यादव यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे घर लाटल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेविकेनं पुरावे देत केला आहे.
BMC corporator legal dispute news; harshwardhan sapkal
BMC corporator legal dispute news; harshwardhan sapkalsarkarnama
Published on
Updated on

BMC Fake Documents Political Allegation Controversy : नुकताच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका झाल्या असून प्रभाग क्रमांक १ मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या रेखा यादव विजयी झाल्या आहेत. पण आता त्या अडचणीत येण्याची शक्यता असून त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडून आल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केला आहे. तसेच म्हात्रे यांनी रेखा यादव यांनी खोटे शपथपत्र सादर करून प्रकल्पबाधितांसाठी राखीव असलेलं घरही लाटल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे. तर याबाबत पुरावे सादर करत म्हात्रे यांनी रेखा यादव यांच्याकडे दोन शिधापत्रिका, दोन राज्यांतील तीन मतदार ओळखपत्रे असल्याचा खळबळजनक दावा देखील केला आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी उपस्थित होते.

'लोकसत्ता'त आलेल्या वृत्तानुसार मुंबई महानगरपालिकेच्या ७९ नगरसेवकांची विविध प्रकरणे न्यायालयात असतानाच काँग्रेसकडून अशा पद्धतीने गंभीर आरोप करण्यात आली आहेत. ज्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली असून शीतल म्हात्रे यांनी रेखा यादव यांच्यावर आरोपांची तोफ डागली आहे.

शीतल म्हात्रे यांनी, रेखा यादव यांच्याकडे दोन शिधापत्रिका असल्याचा दावा करत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केल्याचे म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात रेखा यादव यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करून घेण्यात यावे. तसेच चौकशी करून दोन्ही शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी देखील म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

BMC corporator legal dispute news; harshwardhan sapkal
BMC Mayor Honoured: मुंबईसह महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट; 'BMC'च्या महापौर रितू तावडेंचा उत्तराखंडमध्ये होणार सन्मान

दरम्यान, म्हात्रे यांनी रेखा यादव यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला असून महापालिकेच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत मोफत पुनर्वसन सदनिका लाटल्याचेही म्हटले आहे. महापालिकेच्या एल. टी. रोड रुंदीकरण पुनर्वसन योजनेअंतर्गत त्यांनी ही सदनिका लाटली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या शपथपत्रात त्यांनी स्वतःकडे किंवा त्यांच्या पतीकडे कोणतीही मालमत्ता नसल्याचे म्हटले आहे.

यामुळे निवडणूक आयोगाला यादव यांनी खोटे शपथपत्र सादर कत दिशाभूल केली आहे. यादव यांनी प्रकल्पबधितांसाठी राखीव असलेले घरच लाटल्याचा दावा म्हात्रे यांनी करत खोट्या शपथपत्राद्वारे मिळविलेली सदनिकेचा लाभ रद्द करावा. यादव यांच्याकडून दंडासह वसुली करण्यात यावी असे म्हणत हे फक्त आरोप नसून आपल्याकडे अधिकृत कागदपत्रे आहेत. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत सर्व पुरावे आपण गोळा केल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे.

BMC corporator legal dispute news; harshwardhan sapkal
BMC News : मुंबई महापालिकेतील राजकीय गेम फिरणार? 79 नगरसेवक अडचणीत, निवडणूक प्रक्रियेवरच शंका?

दरम्यान आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून याबाबत आपण आपले म्हणणे आणि सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर केले आहे. यामुळे या आरोपांवर आपण आता बोलणार नाही असे स्पष्टीकरण नगरसेविका रेखा यादव यांनी नगरसेविका रेखा यादव यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com