

Kokan MLC Election : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेच्या १७ जागांच्या छाननीकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. यात सोलापुरमध्ये धक्कादायक बाबत समोर आली असून काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. यामुळे इतर ठिकाणी उमेदवारांची धडधड वाढली आहे. दरम्यान विधान परिषदेच्या कोकण जागेवर दाखल करण्यात आलेल्या १२ नामनिर्देशन पत्रांच्या बाबत महिती समोर आली आहे. येथे सहाही उमेदवारांची १२ नामनिर्देशन पत्रे आज झालेल्या छाननीत वैध ठरले आहेत. यामुळे राष्ट्रवादी समोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह महायुतीतील मित्र पक्ष शिवसेनेचे आव्हान कायम असल्याचे उघड झाले आहे. यामुळे आता खासदार सुनील तटकरे आणि उमेदवार अनिकेत तटकरे यांची धडधड वाढली आहे.
महायुतीत सेटलमेंट होऊन विधान परिषदेची कोकण जागा राष्ट्रवादीला सुटल्याची चर्चा असून उमेदवारी तटकरे यांचे सुपूत्र अनिकेत तटकरे यांना देण्यात आली आहे. त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत सोमवारी आपला अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना आमदार महेंद्र थोरवेही उपस्थित होते.
एकीकडे त्यांच्या उपस्थितीचा फोटो व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला असून कालपर्यंत तटकरे यांच्यावर जहरी टीका करणारे, डीएनए काढणारे आणि राजकीय संघर्ष पेटवणारेच नेते थोरवेच आता तटकरे यांच्या उमेदवारी अर्जावेळी त्यांच्यासोबत गळ्यात गळे घालून दिसल्याने राजकीय वातावरण तापल्याची स्थिती आहे.
दरम्यान आता तटकरेंच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या जुईली दळवी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते बाळ माने यांचा देखील अर्ज वैध ठरला आहे. यामुळे तटकरे यांच्यासमोरील आव्हान कायम आहे. पक्षादेश मानून भरत गोगावले यांनी विकास गोगावले यांना शांत केले. पण यामागे रायगडचे पालकमंत्रिपदाची डिल असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी महायुती धर्म पाळा म्हणत नेत्यांना राष्ट्रवादीचे काम करण्याच्या सूचना केल्या आहे. पण त्यांनी ज्यांनी अर्ज भरला तो मागे घेऊ नका असेही आदेश दिले आहेत. आता हाच मुद्दा धरून आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर पुन्हा तोफ डागत ते कोणताच शब्द पाळत नाहीत. यामुळेच आपण आपल्या मुलीचा अर्ज भरल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी एकूण दाखल सहाही उमेदवारांची १२ नामनिर्देशन पत्रे आज झालेल्या छाननीत वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली आहे. आता नामनिर्देशन पत्रे माघे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार 4 जून हा आहे.
कोणाचे अर्ज वैध ठरले
जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) १
सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे) - ४
अरविंद पुंडलिक म्हात्रे (पींझट्स ॲण्ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया) १
मानसी संतोष म्हात्रे (पींझट्स ॲण्ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया) १
अनिल रमेश चोपडा (अपक्ष) १
अनिकेत सुनिल तटकरे (नॅशलिस्ट काँग्रेस पार्टी) ४
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.