Konkan Politics : रायगडात पालकमंत्री पदावरून खटके उडत असतानाच तटकरेंचा मुलगा गोगावलेंच्या भेटीला, पेढाही भरवला....

Aniket Tatkare and Bharat Gogawale Meeting : कोकणत सध्या महायुतीतील वाद आणखी चिघळला असून पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीत खटके उडताना दिसत आहेत.
Aniket Tatkare and Bharat Gogawale Meeting; Bharat Gogawale and Sunil Tatkare
Aniket Tatkare and Bharat Gogawale Meeting; Bharat Gogawale and Sunil Tatkaresarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Politics : कोकणात विधान परिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला महायुतीतील तिढा सुटला आणि राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला. तर यासाठी रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत डिल झाल्याची चर्चा सुरू झाली. याच चर्चेवरून अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरेंसह मंत्री भरत गोगावले यांना चांगलेच सुनावले. तर गोगावले यांनी मीच पालकमंत्री होणार असे ठासून सांगितले. तर तटकरे यांनी हा प्रश्न वरिष्ठ सोडवतील म्हणत दिलेल्या शब्दावरून युटर्न घेतला. यासर्व राजकीय घडामोडीवरून कोकणातील राजकारण आता चांगलेच तापले असतानाच बिनविरोध झालेले आमदार अनिकेत तटकरे यांनी गोगावलेंची भेट घेतली. फक्त भेटच घेतली नाही तर पेढाही भरवला. यामुळे आता कोकणात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

कोकणातील विधान परिषदेच्या जागेवरून विरोधकांचे एक मताने ठरले आणि उमेदवारही दिला. मात्र नंतर तो उमेदवारच सत्ताधाऱ्यांच्या वळचळीला गेला. त्याची हकालपट्टी झाली ही वेगळी बाब. पण महायुतीत मात्र या जागेवरूनच चांगलीच रस्सी खेच पाहायला मिळाली. आधी मंत्री गोगावले यांचे सुपूत्र विकास गोगावले यांचे नाव समोर आले. तर ते अर्ज दाखल करतील इथेपर्यंत चर्चा सुरू झाली. मात्र ऐन वेळी अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी अर्ज भरला आणि शिवसेनेत अंतर्गत आणि राष्ट्रवादीशी वाद चव्हाट्यावर आला.

आमदार दळवी यांनी थेट तटकरे आणि स्व-पक्षातील नेत्यांवर बोचरी टीका करत तोफ डागली. तसेच फक्त पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी माघार घेण्याचे आदेश दिले म्हणून अन्यथा तटकरेंचाही अंत केला असता असे म्हणत खळबळ उडवून दिली. याचवेळी ठाकरेंच्या उमेदवार बाळ मागे यांनी माघार घेत शिवसेनेसह मविआला जोरदार धक्का दिला आणि ते सत्तेत स्वार होण्यासाठी तयार झाले. तर खासदार तटकरेंचे सुपूत्र बिनविरोध आमदार झाले.

Aniket Tatkare and Bharat Gogawale Meeting; Bharat Gogawale and Sunil Tatkare
Konkan Politics : कोकणात राजकीय भूकंप! भाजपचा शिंदेंसह ठाकरेंना धक्का; तीन बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांचा रामराम

याच बिनविरोधानंतर आता कोकणात जोरदार वाद-विवाद होण्यासह पालकमंत्री पदाच्या दाव्यावरून आता खटके उडताना दिसत आहे. मंत्री गोगावले आणि शिवसेना यावरून दावा सोडायला तयार नाहीत. तर तटकरे काही पालकमंत्री पदाची माळ गोगावलेंच्या गळ्यात पडालया देण्यास तयार नाहीत.

या पार्श्वभूमिवर उदय सामंत यांनी देखील तटकरेंना थेट आवाहन करत दिलेला शब्द पाळावाच लागेल असे म्हणत या वादात उडी घेतली. तर कोण काय म्हणत तटकरेंनी आपला संताप व्यक्त करत सामंत यांच्यावर निशाना साधला. अशा पद्धतीने पालकमंत्री पदाच्या वादाने वात पेटली असानाच आमदार अनिकेत तटकरे यांनी थेट मंत्री गोगावले यांची भेट घेतली.

Aniket Tatkare and Bharat Gogawale Meeting; Bharat Gogawale and Sunil Tatkare
konkan politics : भास्कर जाधवांना धक्का, शेखर निकमांनी केली शिवसेना-भाजपशी युती; राष्ट्रवादीचा अडीच वर्षांचा फॉर्मुला अन् मोठी मागणी

विधान परिषदेच्या निवडणुकीत सगळे मतभेद बाजूला सारत गोगावले यांनी तटकरेंच्या मागे ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. ज्यानंतर आता अनिकेत तटकरे यांनी गोगावलेंची भेट घेत त्यांचा सत्कार केला. तसेच गोगावलेंचे आशीर्वाद घेत त्यांना पेढा भरवला. यानंतर आता रायगडसह कोकणात गोगावलेंची पालकमंत्री पदाची सुरू असलेली रणनीती कामी येत असून राष्ट्रवादीशी असलेला वाद देखील कमी झाल्याचे दिसत आहे. तर तटकरेंशी मिळते जुळते घेतल्याने लवकरच ते पालकमंत्री होतील अशीही येथे कुजबूज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com